
गेल्या काही महिन्यांपासून बॉलीवूडमध्ये अंमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी नारकोटिक्स विभागाच्या धाडी पडत आहेत. त्याला अनेक दिग्गज अभिनेते सामोरे गेले आहेत.
मुंबई - अभिनेत्री राखी सावंत सोशल मीडियावर नेहमी अॅक्टिव्ह असणारी तसेच आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे टीकेला सामोरी जाणारी अशी तिची ओळख आहे. आता पुन्हा ती चर्चेच येण्याचे कारण म्हणजे तिनं आता भारती सिंहची बाजू घेऊन एक राजकीय विधान केलं आहे. तो व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.
गेल्या काही महिन्यांपासून बॉलीवूडमध्ये अंमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी नारकोटिक्स विभागाच्या धाडी पडत आहेत. त्याला अनेक दिग्गज अभिनेते सामोरे गेले आहेत. अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी नुकतेच कॉमेडियन भारती सिंहला अटक करण्यात आली आहे. याचे समर्थन करुन राखीने राजकीय नेत्यावर निशाणा साधला आहे. ती म्हणाली, कधीही कुठेही कुणाच्याही घरी अचानक छापा घातला जातो आणि तेथे ड्रग्ज मिळतात. मला वाटते याविषयी कुणी टीप देत आहे का? या संदर्भात कोणी फोन करुन माहिती देत आहे का? मला याबाबत काहीही माहिती नाही.
मला फक्त एवढेच म्हणायचे आहे की. नेहमी फक्त कलाकारच का पकडले जातात? का कोणत्या मंत्र्याचा मुलगा पकडला जात नाही? देशात ड्रग्ज केवळ कलाकारच घेतात का? दुसरे का पकडले जात नाहीत?’ अशा शब्दांत राखीनं आपली भावना व्यक्त केली आहे.केंद्रीय अंमली पदार्थविरोधी पथकाने (एनसीबी) कॉमेडियन भारती सिंह हिच्या घरी छापा घातला होता. भारती सिंहच्या घरात अंमली पदार्थ आढळून आल्यानंतर एनसीबीने तिला चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं.
शुटींगमधून ब्रेक घेत संजय दत्तला भेटण्यासाठी पोहोचली कंगना रनौत
चौकशीत भारतीने अंमली पदार्थांचे सेवन करत असल्याची कबुली दिल्यानंतर एनसीबीने तिला ‘एनपीडीएस’ कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली होती. त्यानंतर तिला जामीनही मंजूर केला गेला.राखी म्हणाली, मला असे वाटते हे कोणाचे तरी षडयंत्र आहे. कोणी तरी भारतीच्या घरात ड्रग्ज ठेवले आणि फोन केला आहे.’
हे ही वाचा: 'मिर्झापूर'चा रॉबीन गर्लफ्रेंडसोबत अडकला विवाहबंधनात, पाहा लग्नसोहळ्याचे फोटो
मला काही कळतच नाहीये,भारतीसोबत असे काही होऊ शकते यावर माझा विश्वासच बसत नाही. कारण ती भारतातील सर्वात लोकप्रिय कॉमेडियन आहे, तिचा सर्वजण आदर करतात. मी जेव्हा भारतीला अटक झाल्याची बातमी ऐकली तेव्हा माझा त्यावर विश्वासच बसत नव्हता. भारती आणि हर्ष माझे चांगले मित्र आहेत.