esakal | Viral Video: 17 सेकंदात बदलले 6 ड्रेस,'मॅजिक गर्ल' रकुलची कमाल
sakal

बोलून बातमी शोधा

Viral Video: 17 सेकंदात बदलले 6 ड्रेस,'मॅजिक गर्ल' रकुलची कमाल

Viral Video: 17 सेकंदात बदलले 6 ड्रेस,'मॅजिक गर्ल' रकुलची कमाल

sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - केवळ बॉलीवूडमध्येच (bollywood) नाहीतर साऊथमध्ये (south)देखील आपल्या नावाचा करिष्मा दाखविणारी अभिनेत्री म्हणून रकुल प्रीत सिंगचे (rakulpreet singh) नाव घ्यावे लागेल. सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असणारी रकुल आता तिच्या एका व्हिडिओमुळे चर्चेत आली आहे. त्याचे कारण म्हणजे तिनं अवघ्या 17 सेकंदात सहा ड्रेस चेंज केले आहेत. तिचा तो व्हिडिओ तिच्या चाहत्यांना कमालीचा आवडला आहे. त्यावर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंटसही दिल्या आहेत. सोशल मीडियावर चाहत्यांना नेहमी वेगवेगळ्या फोटो आणि व्हिडिओची मेजवानी देणाऱ्या रकुलनं आपल्या नावाचा वेगळा ठसा उमटविला आहे. (actress rakul preet singh video viral instagram changing cloths in 17 secs yst88)

काही दिवसांपूर्वी तिनं आपल्या वर्कआऊटचा व्हिडिओही रिलिज केला होता. त्यालाही चाहत्यांचा प्रतिसाद मिळाल्याचे दिसुन आले आहे. आताच्या व्हिडिओमध्ये ती आरशासमोर उभी आहे. त्यात ती एकापाठोपाठ कपडे बदलताना दिसते आहे. इंस्टावर तिनं हा व्हिडिओ शेयर केला आहे. त्यात एकापाठोपाठ एक असे सहा ड्रेस तिनं चेंज केले आहे. हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. तिनं त्या व्हिडिओला कॅप्शनही दिले आहे.

त्या कॅप्शनमध्ये रकुल म्हणते, मिरर, मिरर...रकुलच्या या व्हिडिओचे तिच्या चाहत्यांना कौतुक केलं आहे. त्या व्हिडिओला आतापर्यत 3.5 मिलियन व्ह्युज आले आहेत. याशिवाय पाच लाईक्सही मिळाले आहेत. तिला व्यंकटेश नावाच्या एका युझर्सनं कमेंट केली आहे. त्यात त्यानं तिला मॅजिक गर्ल असे म्हटले आहे. हा व्हिडिओ ट्रान्झिंशन मोडमध्ये तयार करण्यात आला आहे. आपल्या अभिनयाच्या जोरावर रकुलनं साऊथ आणि बॉलीवूडमध्ये एक वेगळे स्थान निर्माण केले आहे.

हेही वाचा: फक्त इंडस्ट्रीबाहेरील लोकांना काम देणार का? तापसी म्हणते..

हेही वाचा: 'येऊ कशी..'मधील मोहितची रिअल लाइफ पार्टनर, पहा खास फोटो

रकुलच्या आगामी काही प्रोजेक्टविषयी सांगायचे झाल्यास ती यावर्षी एका चित्रपटामध्ये दिसणार आहे. थँक गॉड ही इंद्र कुमार नावाच्या दिग्दर्शकानं ही फिल्म डिरेक्ट केली आहे. त्यात अजय देवगण याची प्रमुख भूमिका आहे. याशिवाय आणखी काही चित्रपटांमध्येही ती दिसणार आहे.

loading image