अभिनेत्री रसिका दुग्गलच्या नृत्यावर तुम्हीही थिरकणार; वाचा सविस्तर...

संतोष भिंगार्डे
Thursday, 23 July 2020

अभिनेत्री रसिका दुग्गल यापूर्वी अनेक सीरियसमध्ये वेगवेगळ्या भूमिकेत दिसली होती. परंतु अशा हलक्या-फुलक्या कौटुंबिक नाटक-चित्रपटात तिला प्रथमच पाहणे मजेशीर ठरेल.

मुंबई : अभिनेत्री रसिका दुग्गल हिने आपल्या अभिनय कौशल्याने हिंदी चित्रपटसृष्टीत आपला ठसा उमटवला आहे. आता पहिल्यांदाच रसिका 'लूटकेस' या विनोदी चित्रपटाचा भाग बनणार आहे. ती 'लूटकेस' या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिकेत आपल्याला दिसेल. कुणाल खेमूबरोबर स्क्रीन शेअर करताना रसिका ही 'लूटकेस' या चित्रपटातून तिच्या व्यक्तिमत्त्वाचा एक अनोखा पैलू उलगडणार आहे. पूर्वी अनेक वेगवेगळ्या व्यक्तिरेखा साकारलेली रसिका या चित्रपटात पहिल्यांदाच नृत्य करताना दिसणार आहे.

यशस्वी वैमानिक होऊन बापाचं कर्ज फेडणाऱ्या 'या' महिलेची यशोगाथा नक्की वाचा

तिच्या अनुभवाबद्दल सांगताना रसिका दुग्गल म्हणाली, "मी खूप खुश आहे की मी लिपसिंक गाणे असलेल्या या चित्रपटाचा एक भाग आहे आणि मला त्या गाण्यावर नाचण्याची संधी मिळाली. माझ्यासाठी या गाण्याच्या सिक्वेलच्या शूटिंगचा अनुभव खूप नवीन आणि मजेदार होता. कोरिओग्राफर आदिल शेख आणि त्यांच्या टीमने या गाण्यावर मी नाचू शकते असा आत्मविश्वास मला दिला."

कोरोनाबाधितांची घुसमट थांबणार! वाशीच्या प्रदर्शन केंद्रातील 500 खांटांचे ऑक्सिजन सुरू...

अभिनेत्री रसिका दुग्गल यापूर्वी अनेक सीरियसमध्ये वेगवेगळ्या भूमिकेत दिसली होती. परंतु अशा हलक्या-फुलक्या कौटुंबिक नाटक-चित्रपटात तिला प्रथमच पाहणे मजेशीर ठरेल. यापूर्वी 'सिंग्या', 'किस', 'मंटो', 'हमीद' या सिनेमांमध्ये तिने दमदार भूमिका केल्या. तसेच 'मिर्झापूर', 'आउट ऑफ दिल्ली', 'दिल्ली क्राईम' अशा सिरीज मधून आपल्या अभिनयाने लोकांची मनं जिंकणारी रसिका दुग्गल ही एक हरहुन्नरी अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. यानंतर ती 'मिर्झापूर सीझन 2', 'दिल्ली क्राइम सीझन 2', 'लॉर्ड कर्झनची हवेली'मध्ये दिसणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: actress rasika duggal will share dance steps in lootcase movie