रेशम आणि राजेश आठवतायत का? बिगबॉस नंतर पुन्हा एकत्र येतायत 'या' मालिकेत.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

actress resham tipnis play role of dwarkabai holkar in punyashlok ahilyabai with rajesh shringarpure

रेशम आणि राजेश आठवतायत का? बिगबॉस नंतर पुन्हा एकत्र येतायत 'या' मालिकेत..

रेशम टिपणीस आणि राजेश शृंगारपुरे ही जोडी आजही कुणी विसरलेलं नाही. बिग बॉसच्या पहिल्या पर्वातील हे गाजलेले कपल. बिग बॉस मध्ये आलेले हे दोन मित्र नंतर एकमेकांच्या खूप जवळ आले. त्यांच्यात काही नटे निर्माण झाले आहे का, अशाही चर्चा सुरु होत्या. पुढे त्यांचात काही वाद झाले आणि या चर्चांना पूर्णविराम मिळाला. पण हि जोडी अजूनही प्रेक्षक विसरलेले नाही. विशेष म्हणजे लवकरच हि जोडी पुन्हा एकत्र दिसणार आहे. रेशमनामे बऱ्याच वर्षांनी मालिका जगतात पदार्पण केले आहे.

हेही वाचा: सलमान खानच्या वकिलाला बिश्नोई गॅंगची धमकी.. म्हणाले, मुसेवाला सारखं..

resham tipnis : बोल्ड, ब्युटीफुल आणि तितकीच बेधडक अशी अभिनेत्री रेशम टिपणीस (Resham Tipnis) ची ख्याती आहे. रेशमने अनेक नाटक, चित्रपट आणि मालिका केल्या आहेत. आता ती पुन्हा एकदा रसिकांचे मनोरंजन करायला येत आहे. रेशम टिपणीस आता सोनी टीव्हीवरील ‘पुण्यश्लोक अहिल्याबाई ’ मालिकेत पाहायला मिळणार आहे.

(actress resham tipnis play role of dwarkabai holkar in punyashlok ahilyabai serial with rajesh shringarpure nsa95)

हेही वाचा: 'हे चित्र आम्हा हिंदूंना सुखावणारं', शरद पोंक्षे यांचे एकनाथ शिंदेंना पुन्हा समर्थन..

या मालिकेच्या निमित्ताने एका मोठ्या आणि महत्त्वाच्या भूमिकेत रेशमी पाहायला मिळणार आहे. 'द्वारकाबाई होळकर' हे पात्र रेशम साकारणार आहे. अहिल्याबाईंच्या आयुष्यात काहीशी अडचण निर्माण करणारं हे पात्र आहे. सोनी टीव्हीने रेशमच्या येण्याची घोषणा एका पोस्टरद्वारे केली. या मालिकेतील काळ आठ वर्षांनी पुढे गेल्याने दिसणार आहे. विशेष म्हणजे या मालिकेत अभिनेता राजेश शृंगारपुरे (rajesh shringarpure) मल्हारराव होळकरांचे पात्र साकारत आहे. या निमित्ताने रेशम आणि राजेश पुन्हा एकत्र येणार आहेत.

Web Title: Actress Resham Tipnis Play Role Of Dwarkabai Holkar In Punyashlok Ahilyabai Serial With Rajesh Shringarpure

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top