Breastfeeding Week : अभिनेत्री समीरा रेड्डीने शेअर केला व्हिडिओ

Sameera Reddy
Sameera Reddy

मुंबई : जगभर साजरा करण्यात येत असलेल्या Breastfeeding Week निमित्त बॉलिवूड अभिनेत्री समीरा रेड्डी हिने आई आणि मुलाच्या नात्याबद्दल सांगणारा व्हिडिओ शेअर केला आहे.

समीरा रेड्डी नुकतीच दुसऱ्यांदा आई झाली. गरोदरपणातही तिने डोहाळ जेवणापासून ते प्रेग्नंसी शूटपर्यंतचे सगळे फोटो सोशल मीडियावर अपलोड केले होते. मुलगी झाल्यानंतरही तिने मुलीसोबतचे फोटो शेअर केले. तिने शेअर केलेले प्रत्येक व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले.

नुकताच तिने एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओतून तिने एक महत्त्वपूर्ण मेसेजही दिला आहे. विशेष म्हणजे या व्हिडिओसाठी समीराचं कौतुकही होत आहे. समीराने Breastfeeding Weekवर मुलीसोबतचा एक फोटो शेअर केला. यानंतर तिने फक्त आईंसाठीच नाही तर बाबांसाठीही एक महत्त्वाचा संदेश दिला. तिने या फोटोसोबत लिहिले आहे, की नव्याने पितृत्वाच्या जबाबदारी स्वीकारलेल्या बाबांनो हा वर्ल्ड ब्रेस्टफीडिंग वीक आहे. ही पोस्ट तुम्हाला हे सांगण्यासाठी आहे की तुम्ही तुमच्या मुलांच्या आईचे सर्वात महत्त्वाचे पाठिराखे आहात. एक आई नैराश्यग्रस्त होऊ शकते. तिच्यात आत्मविश्वासाची कमतरता असू शकते. ती तणावातही असू शकते. याचा परिणाम ब्रेस्टफीडिंगवर होऊ शकतो. या सर्व गोष्टी मिल्क प्रोडक्शनवर सरळ परिणाम करत नसल्या तरी मुलासाठीच्या तिच्या प्रतिक्रियेमध्ये बदल येऊ शकतात. यामुळे मूल कमी दूध पिऊ शकतं आणि मिल्क प्रोडक्शनची समस्याही निर्माण होऊ शकते. त्यामुळए तुम्ही पत्नीची साथ कधीही सोडू नका.

यासोबत समीराने एक व्हिडिओ शेअर केला. यात ती म्हणाली की, ती या ब्रेस्टफीडिंग वीकला अनेक व्हिडिओ आणि पोस्टच्या मार्फत आई- वडिलांच्या संपर्कात राहील आणि या विषयाशी संबंधीत अनेक महत्त्वाच्या गोष्टी शेअर करेल. समीराशिवाय नेहा धुपियानेही वर्ल्ड ब्रेस्टफीडिंग वीकला एक कँपेन लॉन्च केलं. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com