अभिनेत्री सायली संजीव बिग बॉसच्या घरात? 'तो' फोटो झाला व्हायरल.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

actress sayali sanjeev  in bigg boss marathi

अभिनेत्री सायली संजीव बिग बॉसच्या घरात? 'तो' फोटो झाला व्हायरल..

Bigg Boss marathi season 4: लाखो तरुणांच्या मनाला भुरळ घालणारी अभिनेत्री सायली संजीव गेल्या काही दिवसांपासून बरीच चर्चेत आहे. सायलीच्या 'गोष्ट एका पैठणीची' या मराठी चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यापासून तिच्यावर प्रेमाचा वर्षाव होत आहे. पण आता चर्चा काहीशी वेगळ्याच वळणाकडे गेलेली दिसते. सायली संजीव (sayali sanjeev) बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वात सहभागी होणार का, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. त्याचे कारणही तसेच आहे. सायलीच्या एका फोटोमुळे या चर्चा सुरू झाल्या आहेत. (actress sayali sanjeev participate in bigg boss marathi her story viral viral)

'बिग बाॅस मराठी' या लोकप्रिय कार्यक्रमाचे चौथे पर्व लवकरच सुरु होणार आहे. नुकतेच कलर्स मराठीने एक व्हिडिओ शेअर त्याची तारीखही जाहीर केली. 100 दिवस चालणारा हा खेळ 2 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. पण यंदा बिग बॉस च्या घरात नेमकं कोण कोण असणार हे काही अद्याप उघड झालेलं नाही. काहींनी अंदाज बांधला असला तरी अद्याप अधिकृत रित्या कुणाचेही नाव समोर आलेले नाही. असे असले तरी अभिनेत्री सायली संजीव हिने नुकतीच एक इन्टाग्राम स्टोरी शेअर केली होती. या स्टोरीमुळे ती बिग बॉस मराठी मध्ये सामील होणार हा असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.

sayali sanjeev bigg boss

sayali sanjeev bigg boss

सायलीने शेअर केलेल्या स्टोरी मध्ये म्हंटले आहे की, '१ ऑक्टोबर पर्यंत नेटवर्क नसलेल्या ठिकाणी चित्रीकरण सुरू आहे. तेव्हा लवकरच भेटू' असे ती म्हणते. विशेष म्हणजे २ ऑक्टोबर पासून बिग बॉस मराठी सुरू होत आहे. त्यामुळे सायली बिग बॉस च्या घरात दिसणार असा अंदाज अनेकांनी बांधला आहे. या पर्वाचे सूत्रसंचालन महेश मांजरेकर करणार असून पुन्हा एकदा राडा, वाद आणि भरगोस मनोरंजन प्रेक्षकांना मिळणार आहे.

Web Title: Actress Sayali Sanjeev Participate In Bigg Boss Marathi Her Story Viral Viral

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..