esakal | मोठ्या बहिणीला मिळालं मोठ्ठं यश, दुसरीला लोकं विसरले

बोलून बातमी शोधा

athiya shetty}

शमितानं एका मुलाखतीत असे सांगितले होते की, माझ्याकडून चूकीच्या चित्रपटांची निवड झाली त्याचा परिणाम माझ्या करिअरवर झाला.

मोठ्या बहिणीला मिळालं मोठ्ठं यश, दुसरीला लोकं विसरले
sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीम

मुंबई -बॉलीवूडमध्ये सातत्याने नेपोटिझमचा मुद्दा समोर येत असतो. सोशल मीडियावरही त्याची चर्चा होते. त्यावरुन कितीही चर्चा झाली तरी काही अभिनेते असे असतात की त्यांना त्याचे काही वाटत नाही ते आपल्या कष्टाच्या जोरावर यश संपादन करताना दिसतात. तर काहीजणांच्या पाठीशी गॉडफादर असतानाही त्यांना म्हणावी अशी लोकप्रियता मिळत नाही. त्यांची ओळख त्यांच्या वडिल, आई, भाऊ, बहिण यांच्यामुळे असते. अभिनेत्री शमिता शेट्टीचे याबाबतीत नाव सांगता येईल. तिची मोठी बहिण शिल्पा शेट्टी. बॉलीवूडमधील प्रसिध्द अभिनेत्री. शमिताला तिच्या तुलनेत कमी प्रसिध्दी मिळाली.

आज शमिताचा वाढदिवस आहे. त्यानिमित्तानं तिच्या काही बॉलीवूडमधील आठवणींना उजाळा देण्याचा प्रयत्न केला आहे. 42 व्या वर्षात पदार्पण करणा-या शमिताला स्वताची ओळख तयार करण्यासाठी खूप प्रयत्न करावा लागला. मात्र तिला आपल्या बहिणीच्या तुलनेत म्हणावे असे यश मिळाले नाही. २ फेब्रुवारी १९७९ मध्ये जन्म झालेल्या शमितानं सेंट अँथोनी हायस्कूलमध्ये आपले शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर ती पुढील शिक्षणासाठी मुंबईत आली. तिथं तिनं सीडेनहम कॉलेजमध्ये कॉमर्समध्ये पदवीचे शिक्षण पूर्ण केले. एवढेच नाहीतर तिनं एका कॉलेजमध्ये फॅशनचे शिक्षणही पूर्ण केले आहे. पुढे ती प्रसिध्द डिझायनर मनीष मल्होत्राकडे इंटर्नशिप करत होती.

मनीषनं शमिताला सांगितले होते की, तुझ्यात एनर्जी आहे. टँलेट आहे. तु काही नवी करु शकतेस. तु अॅक्टिंग करायला हरकत नाही. यावर गंभीरणे विचार करुन प्रयत्न करायला हरकत नाही. २००१ मध्ये शमितानं बॉलीवूडमध्ये डेब्यु केले होते. त्यावेळचा ब्लॉकबस्टर मुव्ही मोहब्बते चित्रपटांतून आपल्या अभिनयाच्या प्रवासाला सुरुवात केली होती. त्यासाठी तिला आयफाचे बेस्ट डेब्यु अॅक्टर (फीमेल) चा पुरस्कार मिळाला होता. त्याचवेळी तिचं शरारा शरारा नावाचे गाणे प्रचंड लोकप्रिय झाले होते. यानंतर २००५ मध्ये आलेल्या जहर नावाच्या सिनेमामध्येही तिच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. याशिवाय शमितानं इंटेरियर डिझायनिंगमध्येही चांगले नाव कमावले होते. तिनं मुंबईतील रॉयल्टी क्लबचे डिझाईन केले होते.

शमितानं एका मुलाखतीत असे सांगितले होते की, माझ्याकडून चूकीच्या चित्रपटांची निवड झाली त्याचा परिणाम माझ्या करिअरवर झाला. त्याचा आता मला पश्चाताप होतो आहे. त्यावेळी मी अधिक गांभीर्यानं त्याचा विचार करायला हवा होता तसे काही झाले नाही. मी चांगली अभिनेत्री झाले असते पण काही चित्रपट केल्यानंतर मी सिलेक्टिव्ह झाले. हे मी विसरले की, आपण जर लोकांना दिसलो नाही तर लोकं तुम्हाला विसरुन जातील. मी ज्यावेळी बॉलीवूडमधून बाहेर पडले तेव्हा मला हे कळलं. 

आमिर खानचा मोठा निर्णय; 'या' कारणामुळे वापरणार नाही मोबाइल फोन

बॉलीवूडचा एक नियम आहे तो म्हणजे, तुम्हाला सतत काम करायला लागते. ते लोकांना दाखवावे लागते. लोकांच्या नजरेत भरण्यासाठी अपडेट राहणे गरजेचे आहे. या नियमाचा विसर पडला की तुम्ही स्पर्धेपासून बाहेर फेकले जाता. शमिता ब्लॅक विडो नावाच्या एका वेबसीरिज मध्ये शेवटी दिसली होती.