esakal | 'अ‍ॅसिड टाकण्याच्या कितीही धमक्या दिली घाबरणार नाही'

बोलून बातमी शोधा

actress shehnaaz gill says thanks to those who are sharing her morphed video and giving acid attack threat}

लोकांना हे माहिती नाही की, जर कोणी आपल्याबद्दल नकारात्मक बोलत असेल तर अनेकजण तुमच्याविषयी सकारात्मकदृष्ट्या विचार करतात.

manoranjan
'अ‍ॅसिड टाकण्याच्या कितीही धमक्या दिली घाबरणार नाही'
sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीम

मुंबई - बिग बॉस च्या 13 व्या सीझनमधील स्पर्धक शहनाज गिलच्या मागे आता एक नवे संकट उभे राहिले आहे. ते म्हणजे तिला एकानं अॅसिड हल्ल्याची धमकी दिली आहे. मात्र त्या धमकीचा कुठलाही परिणाम शहनाजवर झालेला नाही. तिनं न डगमगता त्या धमकी देणा-याला सुनावले आहे. ज्याने कोणी आपल्याला अॅसिड टाकण्याची धमकी दिली आहे त्याला तिनं धन्यवाद दिले आहे. सोशल मीडियावर याची माहिती देणारी पोस्ट जेव्हा शहनाजनं शेअर केली तेव्हा तिच्या फॅन्सनं काळजी व्यक्त केली आहे. तसेच तिला काही जणांनी तातडीनं पोलिसांशी संपर्क साधण्यास सांगितले आहे.

 तुम्ही मला अ‍ॅसिड हल्ल्याच्या वाट्टेल तितक्या धमक्या दिल्या तरी माझ्यावर त्याचा काहीही परिणाम होणार नाही असे तिनं सांगितले आहे. सोशल मीडियावर शहनाज गिल अॅक्टिव्ह असणारी सेलिब्रेटी आहे. तिचा फॅन फॉलोअर्सही मोठा आहे. बिग बॉस संपल्यानंतरही तिच्या लोकप्रियतेत काही कमी झालेली नाही. त्या शो मधून तिनं प्रेक्षकांची मनं जिंकली होती. भलेही तिच्या वाट्याला यश आले  नसेल मात्र त्या प्रेक्षकांचं प्रेम तिला मिळालं होतं. अॅसिड हल्ल्याची धमकी मिळताच सोशल मीडियावर काही मॉर्फ केलेले व्हिडिओ शेअर करण्यात आले आहे.

शहनाजला प्रेक्षकांनी सपोर्ट केला आहे. बॉलीवूड हंगामाला दिलेल्या मुलाखतीत तिनं सांगितलं की, मला अशा प्रकारच्या धमक्यांचे काही वाटत नाही. मी त्याचा फारसा विचारही करत नाही. मी अशा लोकांना उलट धन्यवाद देते. ते जे करत आहे त्याबद्दल. त्यामुळे मला लोकांची सहानुभुती मिळत आहे. लोकांचे प्रेम मिळते आहे. ते जास्त महत्वाचे वाटते.

लोकांना हे माहिती नाही की, जर कोणी आपल्याबद्दल नकारात्मक बोलत असेल तर अनेकजण तुमच्याविषयी सकारात्मकदृष्ट्या विचार करतात. सध्या शहनाज गिल एका म्युझिक व्हिडिओमध्ये दिसली होती. तिचा सिध्दार्थ शुक्ला बरोबर हॅबिट नावाचा व्हिडिओ येत असून प्रसिध्द रॅपर बादशाहबरोबरही ती दिसणार आहे.