अभिनेत्री सोहा अली खान रक्षाबंधनाला भावाला देणार पौष्टिक गिफ्ट...

संतोष भिंगार्डे
शनिवार, 1 ऑगस्ट 2020

यंदा कोरोनामुळे आपले आरोग्य जपणे तितकेच आवश्यक आहे. त्यामुळे आरोग्य उत्तम राखण्यासाठी बदामाची भेटवस्तू देण्याचा तिने निर्णय घेतला आहे. 

मुंबई : रक्षाबंधन म्हणजे बहीण व भाऊ यांच्यातील प्रेमळ नात्याचा सण. या दिवशी बहीण भावाला राखी बांधते आणि आयुष्यभर संरक्षण करण्याचे वचन घेते. श्रावण महिन्यात हा सण येतो आणि सगळीकडे तो मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. रक्षाबंधनाला भेटवस्तू आणि शुभेच्छांची देवाणघेवाण सुरू असते. सेलिब्रेटीदेखील हा सण तितक्याच उत्साहाने साजरा करीत असतात. 

सदनिकेतील गळतीसाठी चक्क महापालिकेने बजावली नोटीस; याप्रकारची पहिलीच घटना...

अभिनेत्री सोहा अली खानने यावर्षी आपल्या भावंडांना आणि प्रियजनांना काहीशी वेगळी गिफ्ट देण्याचा निर्णय घेतला आहे. कारण यंदा कोरोनामुळे आपले आरोग्य जपणे तितकेच आवश्यक आहे. त्यामुळे आरोग्य उत्तम राखण्यासाठी बदामाची भेटवस्तू देण्याचा तिने निर्णय घेतला आहे. 

तब्बल चार महिने त्यांनी प्रतिक्षा केली; अखेर फोन आला आणि ते गावी परतले...

ती म्हणते, की ''मी नेहमीच विचारशील गिफ्ट्स देण्‍याचा प्रयत्न करते. ज्‍यामुळे सेलिब्रेशन अधिक खास बनून जाते. यंदा रक्षाबंधनाला मी माझ्या भावंडांना आणि प्रियजनांना देणाऱ्या गिफ्ट्समध्‍ये बदामांचा समावेश असेल. कारण बदामांमध्‍ये विविध पौष्टिक घटक असतात. त्यामुळे ते निश्चितच सर्वांना आवडेल, अशी मला खात्री आहे.
----
संपादन : ऋषिराज तायडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: actress soha ali khan will give healthy gift to her brothers on raksha bandhan