boycottchhapaak hashtag trending on twitter on Deepika Padukone visited JNU
boycottchhapaak hashtag trending on twitter on Deepika Padukone visited JNU

#boycottchhapaak 'टुकडे-टुकडे गँगसोबत गेलेल्या दीपिकाला ब्लॉक करा'; नेटकरी भडकले

नवी दिल्ली : जेएनयुमध्ये विद्यार्थ्यांवर झालेल्या हणामारीचा निषेध देशभरातून होत असतानाच, बॉलिवूडची मंडळीही या आंदोलनात सक्रिय सहभाग घेताना दिसत आहेत. अशातच 'छपाक'गर्ल दीपिका पदुकोन काल (ता. 7) थेट जेएनयुमध्ये पोहोचली. तिच्या या आंदोलनात सहभागी होण्यावरून सोशल मीडियावर तिला ट्रोल करण्यात येत आहे. #boycottchhapaak असा हॅशटॅग ट्विटरवर ट्रेंड करण्यात आला आहे. तिचा आगामी 'छपाक' चित्रपट कोणीही बघू नका असे आवाहन सोशल मीडियावर केले जात आहे. 

'छपाक'च्या प्रमोशनसाठी दिल्लीत असलेली दीपिका काल संध्याकाळी थेट जेएनयुमध्ये पोहोचली. विद्यार्थ्यांवर झालेल्या या हल्ल्यात 34 विद्यार्थी जखमी झाले असून, विद्यार्थी संघटनेची आईशी घोष ही जखमी झाली आहे. दीपिकाने आईशीची यावेळी भेट घेतली. जेएनयूचा माजी विद्यार्थी कन्हैय्या कुमार या हल्ल्याच्या निषेधार्थ सुरू असलेल्या आंदोलनात सहभागी झाला होता. कॅम्पसमध्ये आंदोलन सुरू असताना कन्हैय्या जय भीम जय भीमच्या घोषणा देत होता. त्याचवेळी दीपिका आंदोलनस्थळी दाखल झाली. दीपिकानं केवळ आईशीसोबत काही वेळ चर्चा केली आणि त्यानंतर ती निघून गेली. यावेळी तिनं मीडियाशी कोणत्याही प्रकारे संवाद साधला नाही. 

दीपिका देशविरोधी कारवायांना पाठिंबा देत आहे, त्यामुळे तिला ब्लॉक करा, तिच्या छपाकवर बंदीव घाला, असे सोशल मीडियावर काही जणांचे म्हणणे आहे. दीपिका छपाकच्या प्रमोशनसाठी तिथे आली असे काही जणांचे म्हणणे आहे, तर दीपिका दिल्लीत असती तर ती गेलीच नसती असे काही जण म्हणत आहेत. 

ट्विटरवर #boycottchhapaak हा हॅशटॅग ट्रेंड होत असतानाच दुसरीकडे #ISupportDeepika हा हॅसटॅग ट्रेंडिंग आहे. दीपिकाने जेएनयुमध्ये जाऊन योग्यच केले. विद्यार्थ्यांना समर्थन देऊन दीपिका योग्य वागली आम्ही तिच्या पाठिशी आहोत, असे काही जणांचे म्हणणे आहे.

काय घडलं रविवारी?
रविवारी जेएनयूमधील साबरमती होस्टेलच्या बाहेर 200 जणांचा जमाव एकत्र आला होता. यात काही मुलींचाही समावेश होता. सायंकाळी सातच्या सुमारास हा जमाव एकत्र आला. तोंडाला रुमाल बांधून आलेल्या या जमावातील तरुणांनी जेएनयूतील विद्यार्थ्यांना मारहाण करायला सुरुवात केली. त्यात काही प्राध्यापक आणि इतर कर्मचाऱ्यांनाही मारहाण झाली. या घटनेचे पडसाद देशभरात उमटले आहे. विद्यार्थी संघटनेने हा हल्ला अभाविपच्या कार्यकर्त्यांनी केल्याचा आरोप केला. तर, हिंदू राष्ट्र दल या संघटनेने आज, जेएनयूतील हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com