esakal | अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचा दुबईत पार पडला साखरपुडा, वाढदिवसाच्या दिवशी दिलं चाहत्यांना सरप्राईज
sakal

बोलून बातमी शोधा

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचा दुबईत पार पडला साखरपुडा, वाढदिवसाच्या दिवशी दिलं चाहत्यांना सरप्राईज

आपल्या सगळ्यांसाठीच आपला वाढदिवस हा खास असतो. मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने एका मोठ्या खुलासा आणि घोषणेसोबत तिचा वाढदिवस खास बनवलाय.

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचा दुबईत पार पडला साखरपुडा, वाढदिवसाच्या दिवशी दिलं चाहत्यांना सरप्राईज

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई- आपल्या सगळ्यांसाठीच आपला वाढदिवस हा खास असतो. मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने एका मोठ्या खुलासा आणि घोषणेसोबत तिचा वाढदिवस खास बनवलाय. नुकताच डान्सिंग क्वीन सोनालीने तिच्या साखरपुड्याची घोषणा केलीये. सोशल मिडियावर सोनालीने तिचा होणारा नवरा कुणाल बेनोडकर सोबत एक फोटो पोस्ट केला आहे. दोघांनी यावर्षी २ फेब्रुवारी २०२० ला साखरपुडा केला. याविषयीची माहिती तिने तिच्या खास अंदाजात दिली आहे. सोनालीने सोशल मिडियावर तीन वेगवेगळ्या पोस्ट शेअर करत सांगितलं की त्यांचा ०२-०२-२०२० या स्पेशल तारखेला साखरपुडा पार पडला आहे.

हे ही वाचा: डोळे मिचकावून रातोरात स्टार झालेली अभिनेत्री प्रिया प्रकाश वॉरिअर इंस्टाग्रामवरुन अचानक गायब

सोनालीने शेअर केलेल्या या फोटोमध्ये ती साऊथ इंडियन लूकमध्ये सुंदर दिसत आहे. तर कुणालने भारतीय पद्धतीचा पोशाख धोती आणि शेरवानी घातली आहे. सोनाली आणि कुणाल यांनी दुबईतील मरिना या ठिकाणी साखरुपुडा केला. या सोहळ्याला त्यांचे जवळचे नातेवाईक उपस्थित होते. सोनालीचा १८ मे ला वाढदिवस होता. यंदाचा हा वाढदिवस स्पेशल बनवण्यासाठी तिने तिच्या साखरपुड्याची घोषणा केली. तिने सगळ्यात आधी तिचा आणि कुणालचा एक रोमँटिक फोटो शेअर केला. 

तर दुस-या फोटोमध्ये तिने तिच्या साखरपुड्याची तारीख दाखवणा-या डबीचा फोटो शेअर केला आहे. तिसरा फोटो हा त्यांच्या साखरपुड्याच्या दिवशीचा आहे. ज्यात दोघे मध्यभागी बसलेले दिसून येतायेत आणि त्यांच्या आजुबाजुला त्यांचे जवळचे नातेवाईक बसले आहेत. हे फोटो शेअर करताना सोनालीने  लिहिलंय, 'माझा बर्थडे संपण्याच्या आधी मी एक खास घोषणा करत ओळख करुन देते की ही कुणाल बेनोडकर हा माझा होणारा नवरा आहे. आमचा साखरपुडा ०२.०२.२०२० ला झाला आणि आमचा हा आनंद तुम्हा सगळ्यांसोबत वाटण्यासाठी आजच्या पेक्षा योग्य दिवस असूच शकत नाही असं मला वाटलं, आपले शुभाशिर्वाद कायम पाठीशी असू द्यात'

actress sonali kulkarni gave surprise to her fans got engaged in dubai

loading image