सनी लिओनीची वेब सिरीज वादात

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 जुलै 2018

ही बायोपिक आता वादात सापडली आहे. वेब सिरीजच्या नावात 'कौर' हा शब्द वापरण्यावर एसजीपीसी प्रवक्ते दिलजीत सिंह बेदी यांनी आक्षेप घेतला आहे.

'करनजीत कौर - द अनटोल्ड स्टोरी ऑफ सनी लिओनी' ही नवी वेब सिरीज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही वर्षापूर्वी 'बिग बॉस' या रिअॅलिटी शोमधून भारतात आलेल्या सनी लिओनी हिने बॉलिवूड मध्येही पाऊल ठेवले. रिअॅलिटी शोही तिने केले. पण परदेशातून स्वतःसोबत घेऊन आलेल्या 'पॉर्नस्टार' या शिक्क्याला अनेक प्रयत्न करुनही ती आजपर्यंत संपवू शकली नाही. आजपर्यंतच्या तिच्या जीवनाचा हाच प्रवास 'करनजीत कौर - द अनटोल्ड...' या वेब सिरीजमधून मांडला आहे.  

ही वेब सिरीज म्हणजे सनी लिओनची बायोपिक असेल. काही दिवसांपूर्वीच वेब सिरीजचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. पण ही बायोपिक आता वादात सापडली आहे. वेब सिरीजच्या नावात 'कौर' हा शब्द वापरण्यावर एसजीपीसी प्रवक्ते दिलजीत सिंह बेदी यांनी आक्षेप घेतला आहे. 'कौर' हा शब्द वेब सिरीजच्या नावातून हटविण्याची मागणी दिलजीत सिंह बेदी यांनी केली आहे. 'करनजीत कौर - द अनटोल्ड...' या वेब सिरीजचा पहिला भाग 16 जुलै ला झी5 इंडिया वर प्रदर्शित होणार आहे. 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Actress Sunny Leon Biopic Is In Controversy