esakal | 'तू योध्द्यासारखी न डगमगता उभी राहिलीस' 
sakal

बोलून बातमी शोधा

actress swara bhasker praised taapsee pannu after income tax raid tweet goes viral

आयकर विभागाच्या वतीनं बुधवारी छापा टाकण्यात आला होता.

'तू योध्द्यासारखी न डगमगता उभी राहिलीस' 

sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीम

मुंबई - बॉलीवूडचा प्रसिध्द दिग्दर्शक अनुराग कश्यप आणि अभिनेत्री तापसी पन्नुच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्यांच्या मुंबई, पुण्यातील काही जागांवर छापा टाकण्यात आला आहे. त्यामागील कारणांचा शोध प्रशासन घेत आहे. मात्र यासगळ्या परिस्थितीला सामो-या जाणा-या अनुराग आणि तापसींच कौतूक अभिनेत्री स्वरानं केलं आहे. सोशल मीडियावर स्वराची प्रतिक्रिया व्हायरल झाली आहे. स्वरानं आपला पाठींबा या दोन्ही कलाकारांना दर्शवला आहे. गेल्या काही दिवसांपासून बॉलीवूडमधील वातावरण शांत होते. आता ते पुन्हा याप्रकरणामुळे चर्चेत आले आहे.

आयकर विभागाच्या वतीनं बुधवारी छापा टाकण्यात आला होता. त्यात दिग्दर्शक अनुराग कश्यप, अभिनेत्री तापसी पन्नू, दिग्दर्शक विकास बहल आणि मधू मंटेना यांच्या घरावर बुधवारी आयकर विभागाने धाडी टाकल्या. बुधवारी रात्रीपर्यंत आयकर विभागाकडून छापेमारी सुरु होती. गुरुवारी सकाळी पुन्हा या कारवाईला सुरुवात करण्यात आली. कर बुडवल्याप्रकरणी ही छापेमारी सुरु असल्याचं कळतंय. मुंबईतसोबत पुणे आणि इतर २० जागांवर छापेमारीची कारवाई करण्यात येत आहे.

2011 मध्ये अनुराग कश्यप, निर्माते-दिग्दर्शक विक्रमादित्य मोटवाने, निर्माता विकास बहल, निर्माते-वितरक मधू मंटेना यांनी 'फँटम फिल्म्स' नावाची कंपनी सुरु केली होती. या कंपनीने 'क्वीन', 'लुटेरा', 'एनएच १०', 'मसान', 'उडता पंजाब' यांसारख्या चित्रपटांची निर्मिती केली.  अनुराग कश्यपने 'गुड-बॅड फिल्म्स' तर मोटवाने यांनी 'आंदोलन फिल्म्स' या नावाने स्वतंत्र कंपन्या सुरु केल्या. 'फँटम कंपनी'ने केलेल्या अंतर्गत आर्थिक व्यवहारांची तपासणी आयकर विभागाकडून होत आहे. त्याचप्रमाणे या छाप्यांमधून कर बुडवल्याच्या पुराव्यांची शोधाशोध करण्यात आली, अशीही माहिती समोर येत आहे.

यासगळ्या प्रकरणात स्वरानं म्हटलं आहे की, तापसी मला तुझे कौतूक आहे. तू याप्रकरणात धाडसीपणा दाखवला आहे. त्यामुळे मला तुझा हेवा वाटतो. फार कमी जणांकडे असे धाडस पाहायला मिळते. ते तुझ्याकडे आहे. अशाप्रकारचे व्टिट स्वरानं तापसीसाठी केलं आहे. त्याला नेटक-यांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. 
 

loading image