सिनेमाच्या कास्टिंगसाठी गेल्यावर अभिनेत्रीसोबत घडायचा धक्कादायक प्रकार...

सिनेमा तसंच हिंदी टी.व्ही मालिकांमधून प्रसिद्ध झालेली आणि घराघरात पोहोचलेली अभिनेत्री श्वेता केसवानी सध्या हॉलीवूड शोज् मध्ये व्यस्त आहे.
Sweta Keswani speaks about casting couch in bollywood.
Sweta Keswani speaks about casting couch in bollywood.Instagram

'अभिमान','कहानी घर घर की' आणि 'देश में निकला होगा चॉंद' अशा अनेक हिंदी टी.व्ही मालिकांमधून प्रसिद्ध झालेली आणि घराघरात पोहोचलेली अभिनेत्री श्वेता केसवानी(Shweta Keswani) सध्या हॉलीवूडच्या वाटेवर निघालीय अभिनयात यश मिळतंय का ते पहायला. तसे प्रयत्न ती करत आहे असं तिनं एका मुलाखती दरम्यान सांगितलं आहे. श्वेता अमेरिकेचा प्रसिद्ध शो 'द ब्लॅकलिस्ट' मध्ये सुद्धा दिसली होती. नुकतंच श्वेताने एका मुलाखतीत बॉलीवूड आणि हिंदी टेलीव्हिजनशी संबंधित अनेक धक्कादायक खुलासे केलेत. तिनं कास्टिंग काऊच (Casting Couch)विषयी देखील मोठे खुलासे केले आहेत.

Sweta Keswani speaks about casting couch in bollywood.
ज्येष्ठ अभिनेत्री सायरा बानो का म्हणतायत,''मी खूप त्रासात आहे''

मुलाखतीत कास्टिंग काऊचविषयी विचारलेल्या प्रश्नावर श्वेता केसवानी म्हणाली आहे,''मी बॉलीवूडमध्ये काम नक्कीच केलं आहे,पण कितीतरी सिनेमांवर मी पाणीदेखील सोडलंय. कारण तिथे कास्टिंगसाठी गेले असताना मला सांगितलं गेलं की,तुम्हाला आऊटडोअर शूटच्या वेळेस एकटंच याय़चं आहे आणि त्यावेळी मी आईला सोबत घेऊन प्रवास करायचे. त्यावेळी मी फक्त १८ वर्षांची होते. पण बऱ्याच सिनेमांच्या कास्टिंग दरम्यान सांगितलं जायचं,कोणाला सोबत घेऊन येऊ शकत नाही,एकटीलाच आऊटडोअर शूटसाठी यायचं आहे''.

Sweta Keswani speaks about casting couch in bollywood.
आली समीप लग्नघटिका; नीतू कपूर यांनी खास फोटो शेअर करीत जागवल्या आठवणी

श्वेता केसवानी पुढे म्हणाली,''कितीतरी वेळा सांगितलं गेलं की निर्मात्याशी जवळीक साधा. कधी सांगितलं गेलं की दिग्दर्शक जे बोलेल ते ऐकावंच लागेल आणि त्याच्यासोबत एकटीनं वेगळा वेळ देखील घालवावा लागेल. जिथे एवढ्या अटी घातल्या जायच्या,असे अनेक सिनेमे मी मध्येच सोडून दिले आहेत. कारण मला माहित होतं की हे 'कास्टिंग काऊच' आहे. मला इशाऱ्यांमध्ये हे सगळं करायला सूचित केलं जायचं पण मी या सगळ्यासाठी तयार नव्हते. म्हणून मी सिनेमात काम करताना कमी दिसले कारण माझ्यासोबत कितीतरी सिनेमांच्या बाबतीत या गलिच्छ गोष्टी घडल्या आहेत. आणि मग मी सिनेमांच्या या घाणेरड्या गोष्टींना कंटाळून टी.व्ही. मालिकांमध्ये काम करणं सुरू केलं. त्यावेळी टी.व्ही इंडस्ट्रीत खूप छान ट्रीटमेंट मिळाली''.

Sweta Keswani speaks about casting couch in bollywood.
'रणबीरच्या लग्नाविषयी ऋषी कपूर यांच्या मनात वेगळेच प्लॅन होते'- सुभाष घई

श्वेता पुढे म्हणाली, ''तसं देखील मला वाटतं की जेव्हा एखादी गोष्ट तुम्हाला करायला सांगितली जाते,जी तुमच्या मनाविरोधात असते तेव्हा तिथेच थांबलेलं बरं आणि अशा ठिकाणी काम न करण्याचा थेट निर्णय घेऊन टाका. मग असा प्रश्नच येणार नाही नं,की आधी सगळं मान्य करा आणि मग #Metoo चं रडणं गात बसा. असं तर तुम्ही म्हणू शकत नाही की तुमच्यासोबत चुकीचं घडत होतं आणि हे तुम्हाला माहीतच नव्हतं''. टेलीव्हिजनमधील गटबाजीच्या प्रश्नावर श्वेता केसवानी म्हणाली,''टेलीव्हिजनमध्ये गलिच्छपणा चालत नाही,पण गटबाजी नक्की आहे. जसं एकता कपूरचा ग्रुप. ज्यामध्ये फक्त तिच्या मर्जीतल्या कलाकारांना काम मिळते. पण मला याचा काहीच फरक पडत नाही. कारण मी कधीच एकता कपूरसोबत काम नाही केलं. हॉलीवूडमध्ये संधी तुम्हाला फक्त तुमच्या गुणवत्तेवर आणि त्यानंतर ऑडिशन दिल्यावरच मिळते. मी आतापर्यंत हजारो ऑडिशन दिल्या आहेत,तेव्हा कुठे जाऊन मला कामं मिळण्यास सुरुवात झाली आणि अजूनही माझं स्ट्रगल संपलेलं नाही''.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com