'रणबीरच्या लग्नाविषयी ऋषी कपूर यांच्या मनात वेगळेच प्लॅन होते'- सुभाष घई

रणबीरच्या लग्नाविषयी ऋषी कपूर आपल्याशी काय बोलले होते याविषयी मोठा खुलासा सुभाष घई यांनी केला आहे.
Subhash Ghai, Ranbir Kapoor-Alia Bhatt, Rishi Kapoor.
Subhash Ghai, Ranbir Kapoor-Alia Bhatt, Rishi Kapoor.Google

आलिया भट्ट(Alia Bhatt) आणि रणबीर कपूर(Ranbir Kapoor) लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. या दोघांच्या लग्नाविषयी रोज काही ना काही अफवा कानावर येत असते. अद्यापही या दोघांनी अधिकृतरित्या काहीही सांगितलेलं नाही. यामध्येच आता बॉलीवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक सुभाष घई(Subhash Ghai) यांनी रणबीर-आलियाच्या लग्नाविषयी मोठा खुलासा केला आहे.

Subhash Ghai, Ranbir Kapoor-Alia Bhatt, Rishi Kapoor.
'हिंदीत मराठी कलाकारांना मान आणि धन दोन्ही कमी'; प्रसाद ओकचे कडू बोल

सुभाष घई यांनी नुकतंच एका इंग्रजी वेबसाईटला मुलाखत दिली होती. यादरम्यान त्यांनी आलिया भट्ट आणि रणबीर कपूरच्या लग्नाविषयीही भरपूर गप्पा मारल्या. सुभाष घई यांनी सांगितलं की,''रणबीर-आलिया २०२० च्या डिसेंबर महिन्यातच लग्न करणार होते,पण कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे हे लग्न तेव्हा होऊ शकलं नाही. एवढंच नाही तर सुभाष घई यांच्या मते रणबीरचे वडिल अभिनेता ऋषी कपूर(Rishi kapoor) या दोघांच्या लग्नाविषयी प्रचंड उत्सुक होते. त्यांनी लग्नाच्या ग्रॅंड रीसेप्शन पर्यंत प्लॅनिंग केलं होतं''.

Subhash Ghai, Ranbir Kapoor-Alia Bhatt, Rishi Kapoor.
'दक्षिणेत तुमचे सिनेमे चालवायचेत तर आधी...'; KGF स्टार यशचा सलमानला सल्ला

सुभाष घई म्हणाले,''मला आठवतंय की जानेवारी २०२० मध्ये ऋषि कपूर यांना मी भेटलो होतो,मी त्यांना आमच्या व्हिसलिंग वुड्स इंटरनॅशनल च्या एका कार्यक्रमाचं निमंत्रण द्यायला गेलो होतो. आमच्या अगदी भरपूर मैत्रीपूर्ण गप्पा झाल्या. माझ्यासोबत ती बातमी शेअर करताना त्यांच्या चेहऱ्यावर खूप उत्सुकता होती. २०२० साली त्यांना रणबीरचं आलियाशी मोठ्या धूंमधडाक्यात लग्न करायचं होतं. पण अचानक कॅन्सरमुळे त्यांचं निधन झालं आणि ती इच्छा तेव्हा पू्र्ण झाली नाही''.

Subhash Ghai, Ranbir Kapoor-Alia Bhatt, Rishi Kapoor.
आलिया-रणबीरचं लग्न Postponed! भट्ट कुटुंबाची मीडियाला मोठी माहिती

सुभाष घई पुढे म्हणाले की,''रणबीर-आलिया लग्न करुन ऋषी कपूर यांचं स्वप्न पूर्ण करणार आहेत. मलाही खुप आनंद झाला आहे ते लग्न करतायत हे ऐकून. मी त्यांच्या सुखी वैवाहिक जीवनासाठी प्रार्थना करतो,जसं मी नेहमीच ऋषी कपूर आणि नीतू कपूर यांच्यासाठी करत आलो आहे''. रणबीर-आलिया १४ एप्रिलला लग्न करीत आहेत. १३ एप्रिलला मेहेंदी सोहळा रंगणार आहे. तब्बल चार ते पाच वर्ष डेट केल्यानंतर हे लव्हबर्ड्स लग्न करीत आहेत. त्यामुळे त्यांच्यासोबतच चाहत्यांसाठीही ही एक आनंदाची गोष्ट आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com