esakal | 'तिची लग्नाची इच्छा आहे का? हे नाही विचारलं'; 'किती वाईट'

बोलून बातमी शोधा

actress taapsee pannu shocked as supreme court }

केवळ हिंदी चित्रपटाशी संबंधित तापसी बोलत नाही तर तिनं राजकीय, सामाजिक विषयांवरही प्रतिक्रिया देण्यात ती सर्वात पुढे असते.

'तिची लग्नाची इच्छा आहे का? हे नाही विचारलं'; 'किती वाईट'
sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीम

मुंबई -  तापसी तिच्या वेगवेगळ्या विषयांवर प्रतिक्रिया देण्यासाठी प्रसिध्द आहे. त्यावरुन तिनं अनेक अभिनेत्रींशी पंगा घेतला होता. कंगणा आणि तिचा वाद सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. दोन दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयानं एका पीडितेवर झालेल्या अत्याचाराच्या विरोधात एक निर्णय दिला होता. त्या निर्णयाच्या विरोधात सोशल मीडियावरुन प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. त्यात अभिनेत्री तापसीच्या प्रतिक्रियेनं सर्वाचे लक्ष वेधून घेतले आहे.

केवळ हिंदी चित्रपटाशी संबंधित तापसी बोलत नाही तर तिनं राजकीय, सामाजिक विषयांवरही प्रतिक्रिया देण्यात ती सर्वात पुढे असते. सर्वोच्च न्यायालयाच्या त्या पीडितेला विचारलेल्या प्रश्नावर तापसीनं नाराजी व्यक्त केली आहे. तिनं सर्वोच्च न्यायालयाच्या त्या वक्तव्याला एकदम घटिया असे म्हटले आहे. त्याचे झाले असे की, सोमवारी सर्वोच्च न्यायालयात एक सुनवाणी सुरु होती. सरकारी विभागात काम करणा-या एका विवाहित व्यक्तीवर त्यानं अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यावर झालेल्या सुनावणीत न्याय़ालयानं आरोपीला विचारलं की, तु त्या पीडितेशी लग्न करशील का, त्यावर तापसीनं प्रतिक्रिया दिली आहे.

तापसीनं सोशल मीडियावर लिहिलं आहे की, हाच प्रश्न त्या पीडितेला कुणी विचारला नाही का, तिच्याशी गैरवर्तन करणा-याला मात्र तो प्रश्न विचारण्यात आला होता. हा काय प्रश्न आहे का, हा उपाय म्हणायचा की शिक्षा असा प्रश्न तापसीनं उपस्थित केला आहे. हे सगळं एकदम  वाईट आहे. सोशल मीडियावर तापसीची ही प्रतिक्रिया सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्यावर तिच्या चाहत्यांनीही आपली मतं व्यक्त केली आहे. 

Dance Deewane Season 3; पोटासाठी रोज टॉयलेट साफ करावं लागतयं

 बर्फात खोदलं भुयार, रँचोची कमाल; व्हिडिओ व्हायरल

आरोपीला न्यायालयानं विचारलं होतं की, तु त्या पीडितेशी लग्न करायला तयार आहेस की नाही, मात्र जेव्हा कोर्टाला हे सांगण्यात आले की, आरोपीचे अगोदर एक लग्न झाले आहे त्यावर त्याचा जामीनासाठीचा अर्ज दाखल करण्यास सांगितले आहे. तसचे त्याला अटकपूर्व जामीनासाठी संरक्षणही दिले आहे.