तमन्नाने सांगितला कोरोनाचा अनुभव, ‘त्या वेळी होती मृत्यूची भीती’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

tamannah

काही दिवसांपूर्वीच बाहुबली फेम तमन्ना भाटियाला कोरोनाची लागण झाली होती. मात्र यावर तिने योग्य औषधोपचाराने मात केली. कोरोनाची लागण झाव्यावर अनेकजण भितीनेच अर्धे होतात असंच काहीसं तमन्नाच्या बाबतीतही घडलं होतं. 

तमन्नाने सांगितला कोरोनाचा अनुभव, ‘त्या वेळी होती मृत्यूची भीती’

sakal_logo
By
दिपाली राणे-म्हात्रे

मुंबई- कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव अजुनही आटोक्यात आलेला नाही. कोरोनावरील लस अजुनही न आल्यामुळे देशभरात अजुनही कोरोनाचं थैमान सुरुच आहे. सामान्य माणसांसोबतंच कित्येक सेलिब्रिटी कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. यातलंच एक नाव म्हणजे साऊथची प्रसिद्ध अभिनेत्री तमन्ना भाटिया. काही दिवसांपूर्वीच बाहुबली फेम तमन्ना भाटियाला कोरोनाची लागण झाली होती. मात्र यावर तिने योग्य औषधोपचाराने मात केली. कोरोनाची लागण झाव्यावर अनेकजण भितीनेच अर्धे होतात असंच काहीसं तमन्नाच्या बाबतीतही घडलं होतं. 

हे ही वाचा: मान गये बॉस.. सिनेमातून केलं बाहेर पण एका सीनसाठी घेतले तब्बल ७४ कोटी    

अभिनेत्री तमन्ना भाटियाला कोरोमाची लागण होण्याआधी तिच्या आई वडिलांना देखील कोरोनाचा संसर्ग झाला होता.. त्यांनीही कोरोनावर मात केली. मात्र त्याच्या काही दिवसांनंतर तमन्नाला कोरोनाची लक्षणं जाणवू लागली होती. तमन्ना कोरोना पॉझिटीव्ह आल्यानंतर तिने योग्य उपचार घेऊन त्यावर यशस्वीपणे मात केली.

नुकत्याच एका मुलाखतीत तिने कोरोनाची लागण झाल्यानंतर तिला आलेला अनुभव शेअर केला आहे.तमन्ना म्हणाली, "माझा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला हे ऐकून मी खूप घाबरले होते. कारण त्यावेळी कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत होती. मला देखील मृत्यूची भिती सतावत होती. मात्र डॉक्टरांनी माझा आत्मविश्वास वाढवला. त्यांनी योग्य ते उपचार करुन मला लवकर बरं केलं."

actress tamanna bhatia corona positive shares her experience fear of death  

loading image
go to top