esakal | '43 वर्षांची, म्हणून काय झालं ?',लग्न नाहीच: तनिषाचा खुलासा
sakal

बोलून बातमी शोधा

actress tanisha mukherji

'43 वर्षांची, म्हणून काय झालं ?',लग्न नाहीच: तनिषाचा खुलासा

sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - बॉलीवूडमध्ये तनीषाला (tanisha mukherji) फारसा वाव मिळाला नाही. मात्र तरीही ती नेहमी चर्चेत राहिली. याचे कारण तिच्या नावामागे असलेलं ग्लॅमर. वयाची 43 वर्षे झाली अद्याप तिनं लग्न केलेलं नाही. यासाठी आपल्या परिवाराकडून मोठा पाठींबा मिळाल्याचे सांगताना तनिषाला काय वाटत नाही. ते ही गोष्ट मोठ्या अभिमानानं सोशल मीडियावर सांगते. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत तिनं त्याबद्दल सांगितले आहे. अजूनही लग्नासाठी माझ्या परिवाराकडून कुठल्याच प्रकारचा दबाब नसल्याचेही तिनं सांगितलं आहे. (actress tanisha mukherjee reveals how her family supported not-getting-married at the age of 43 yst88)

तनिषा ही प्रसिद्ध अभिनेत्री तनुजा यांची मुलगी तर काजोलची लहान बहिण आहे. त्यांचे वडिल चित्रपट निर्माते होते. तनिषानं सांगितले आहे की, माझ्या परिवाराकडून मला लग्नासाठी कधीच दबाब नव्हता. मी माझ्या मतांवर ठाम होते. आता माझ्याजवळ सुंदर आयुष्य आहे. मी खूप आनंदी आहे. त्यामुळे अशा गोष्टींचा मी फारसा विचार करत नाही. माझ्या आजीनं मला एक गोष्ट सांगितली होती. ती म्हणजे नेहमी आनंदी राहायचं. आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षणाचा आनंद घ्यायचा. तसं जगणं अधिक अर्थपूर्ण असतं.

माझ्या आईनं मला एक गोष्ट सांगितले, आयुष्य छोटे आहे. त्यापासून नेहमी काही शिकायचं असतं. जे आपलं जगणं अधिक अर्थपूर्ण करतं. मी वयाच्या 39 व्या वर्षी एग्ज फ्रीज करण्याच्या बाबत विचार केला होता. मात्र माझ्याकडून त्यावेळी ते झालं नाही. जेव्हा वैदयकीय सल्ला घ्यायला गेले तेव्हा त्यांनी मला असं न करण्यास सांगितले होते. ते माझ्या आरोग्याच्या दृष्टीनं अधिक धोकादायक होते. असे त्यांचे मत होते. त्यामुळे तो निर्णय मी टाळला. प्रत्येक स्त्रीला अपत्य हवंच हे काही गरजेचं नाही. जगात खूप सारी मुलं आहेत. लोकांनी आता यासगळ्या गोष्टींवर मोकळेपणानं बोलायला हवं. असंही तनिषानं सांगितलं.

हेही वाचा: तूफान!! इतक्या गर्मीतही गुल पनाग ५ किलोमीटर धावली

loading image