Tejaswini Pandit: "काही लोकांनी राजकीय दबाव टाकून माझं.." तेजस्विनी पंडितसोबत झालंय काय? इतकी का संतापली?

Tejaswini Pandit
Tejaswini PanditEsakal

Tejaswini Pandit Post: मराठी अभिनेत्री तेजस्विनी पंडित हे मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय नाव आहे. तेजस्विनी नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते.

तिने अभिनयासोबतच तिच्या सौंदर्यानेही सर्वांना वेडं लावलं आहे. मात्र तेजस्वीनी काही दिवसांपासून तिच्या ट्विटमुळे चर्चेत आली आहे. तिने यापुर्वी टोल मुद्यावर केलेल्या ट्विटची चांगलीच चर्चा झाली होती.

आता तेजस्वीनीच्या ट्विटर अकाऊंटचं व्हेरिफिकेशन काढून घेण्यात आलं आहे. एक्स अकाउंटची ब्लू टिक काढून टाकण्यात आल्याने तेजस्वीनी चांगलीच संतापली असल्याचं दिसतंय. तेजस्वीनी याबाबत ट्विटरवर एक पोस्ट शेयर केली आहे.

तेजस्वीनी या पोस्टमध्ये लिहिते की,

कोंबडं झाकल्याने सूर्य उगवायचा राहात नाही !

माझ्या X (ट्विटर) अकाऊंटचं व्हेरिफिकेशन काही लोकांनी माझं स्पष्ट मत सहन न झाल्याने राजकीय दबाव टाकून काढून टाकण्यास सांगितलं, कारण का तर मी एक ‘आम्हा जनतेची' इतकी वर्ष फसवणूक झाली असा वाटणारा प्रश्न उपस्थित केला म्हणून?

X (ट्विटर ) अकाउंटचा व्हेरिफिकेशन बॅच हा सन्मान असेल तर तो योग्य कारणासाठी जाणं, हा त्याहून मोठा सन्मान मला दिलात त्याबद्दल धन्यवाद.

पण ह्या बंदीने माझा काय किंवा सामान्य माणसांच्या मनातील आक्रोश कमी होणार नाही.

सामान्यांचा आवाज बंद करणे हाच ह्यांचा बहुदा एकमात्र 'X' फॅक्टर आहे हे मात्र स्पष्ट होत जाईल. असो, माझा ‘जय हिंद जय महाराष्ट्र'साठीचा घोष योग्य वेळी सुरूच राहील.

सत्तेत कोणीका बसेना, आम्ही जनता आहोत ! जेंव्हा जेंव्हा आमची पिळवणूक होईल, दिशाभूल होईल, तेव्हा तेव्हा आमचा आवाज दुमदूमणारच आहे ! ! !

जय हिंद जय महाराष्ट्र !

या पोस्ट सोबतच तिने #महाराष्ट्र #टोलधाड #लोकशाही_धाब्यावर #NoDemocracy #MaharashtraPolitics हे हॅशटॅग दिले आहेत.

अभिनेत्री आणि निर्माती अशा दोन्ही भूमिका साकारणाऱ्या तेजस्विनीची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. यात तेजस्वीनीने नाव न घेता सरकारवर निशाणा साधला आहे. कारण यापुर्वी तिने टोल संदर्भात पोस्ट करत राज्य सरकारवर टीका केली होती. नेटकरी तिच्या या ट्विटवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.

यापुर्वी तिने देवेंद्र फडणवीसांचा टोल बाबतचा एक व्हिडिओ शेयर केला होता या व्हिडिओसोबत तिने लिहिले होते, "म्हणजेऽऽऽऽऽऽऽ ??????? ह्यांना कळतंय ना नेमकं हे काय बोलतायत? मग इतके वर्ष आम्ही जो टोल भरतो आहोत तो कुणाच्या खिशात जातोय? राजसाहेब तुम्हीच आता काय ते करा, महाराष्ट्राला वाचवा ह्या टोल धाडीतून!! हे "माननीय उपमुख्यमंत्री" यांचे विधान कसे असू शकते?अविश्वसनीय!! तुमचीही फसवणूक झाली असे वाटत असेल तर शेअर करा!".

आता या ट्विटनंतर तेजस्वीनीचे ट्विटर अकाऊंटचं व्हेरिफिकेशन काढून टाकण्यात आल्याचे बोलले जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com