esakal | "फक्त राजकारण्यांना नाव ठेऊन काय उपयोग?"; राष्ट्रवादीचं तेजस्विनीला उत्तर

बोलून बातमी शोधा

tejaswini  pandit
"फक्त राजकारण्यांना नाव ठेऊन काय उपयोग?"; राष्ट्रवादीचं तेजस्विनीला उत्तर
sakal_logo
By
टीम ई सकाळ

कोरोना आणि त्यामागे चाललेले राजकारण यासंदर्भात मराठी चित्रपटसृष्टीतीली प्रसिद्ध अभिनेत्री तेजस्विनी पंडितने इन्स्टाग्रामवर एक स्टोरी पोस्ट केली होती. यामध्ये तेजस्विनीने लिहिले, 'सगळ्यात मोठी कीड जर आपल्या देशाला, आपल्याच नाही, तर सगळ्या जगाला लागली आहे, ती आहे राजकारण. ही कीड कोविडपेक्षा भयाण, घातक आणि वर्षानुवर्षे आपल्याला पोखरत जाणारी आहे. या कीडपासून बचाव करता आला तर बघा! अवघड आहे सगळंच, काळजी घ्या. सध्या देशात कोरोनाचा कहर पण त्यापेक्षा भयानक आहे ते म्हणजे देशातील आणि जगातील राजकारण असे तेजस्विनीने राजकारणाबद्दलचे मत या पोस्टमधून मांडले होते. ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली. आता तेजस्विनीच्या या वक्तव्यावर राष्ट्रवादीचे चित्रपट आघाडीचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी भाष्य केले आहे.

यासंदर्भात एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बाबासाहेब पाटील म्हणाले, "जगातल्या सर्व लोकशाहींपेक्षा आपल्या देशातील राज्यघटना प्रभावी आहे. बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्य घटनेतून सर्वांना समतेचा अधिकार दिला आहे. जगात प्रतिष्ठित असलेली राज्यघटना ज्यावेळेस लिहिली गेली, त्या वेळेस बाबासाहेब आंबेडकरांनी भविष्यात येणाऱ्या अडचणींचा विचार तेव्हाच करून त्यामध्ये अनेक अशा कलमांच्या तरतुदी करून ठेवल्या आहेत. बाबासाहेब आंबेडकर यांच्या राज्यघटनेप्रमाणे या देशाचा राज्यकारभार चालतो. त्यामुळेच शासकीय यंत्रणांवर अंकुश असावा यासाठी राजकीय यंत्रणेची निर्मिती झाली आहे. शासन आणि प्रशासन असे महत्वाचे दोन घटक या देशाचा कारभार चालवतात. त्यामुळे फक्त राजकारण्यांना नाव ठेऊन काय उपयोग?"

हेही वाचा : 'फुटबॉल झाली आहेस'; म्हणून हिणवणाऱ्याला धनश्री कडगावकरचं सडेतोड उत्तर

img

हेही वाचा : 'लागीरं झालं जी' मालिकेतील 'शीतली'ला कोरोना

राजकारणावर टीका करण्यापेक्षा एक कलावंत म्हणून आपण लोकांसाठी काय करू शकतो, याचा विचार करण्याचा सल्ला बाबासाहेब पाटील यांनी तेजस्विनीला दिला. तेजस्विनी पंडित यांनी केलेल्या टीकेमुळे त्यांनी सर्वच राजकारण्यांना एका पारड्यात ठेवून चांगले काम करणाऱ्या राजकारण्यांना विनाकारण आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करणं, ही बाबच मुळात चुकीची आहे असेही त्यांनी या मुलाखतीत म्हटले आहे.