Tunisha Sharma: ' हा मूर्खपणा...तुनिषाच्या मृत्यूला तिचं कुटुंबच जबाबदार...' शक्तीमान भडकला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Tunisha Sharma

Tunisha Sharma: ' हा मूर्खपणा...तुनिषाच्या मृत्यूला तिचं कुटुंबच जबाबदार...' शक्तीमान भडकला

Mukesh Khanna On Tunisha Sharma Suicide Case: सध्या मनोरंजन विश्वात तुनिषा शर्मा आत्महत्या प्रकरणाचीच चर्चा आहे. वयाच्या २०व्या वर्षी तिने आत्महत्या करत जीवन संपवलं मात्र तिच्या मृत्यूनंतर अनेक प्रश्न निरुत्तर आहेत. तिच्या आत्महत्येला जबाबदार धरत तिचा प्रियकर शीजानला अटक करण्यात आली असून हे लव जिहाद असल्याचं काहींच मतं आहे. यावर अनेकांनी प्रतिक्रिया दिली. दरम्यान 'शक्तिमान' आणि 'भीष्म पितामह' सारखी भूमिकेतून लोकप्रिय झालेले अभिनेते मुकेश खन्ना हा अनेक मुद्यावर भाष्य करत असतो.

हेही वाचा: Tunisha Sharma: मी तिच्या आईला आधीच बजावलं होत...शिजानने केला खुलासा...

मुकेश खन्ना यांनी भीष्म इंटरनॅशनल या यूट्यूब चॅनलवर १५ मिनिटांचा व्हिडिओ अपलोड केला आहे. यावेळी त्यांनी तुनिषाच्या पालकांना तसेच इतर मुलींच्या कुटुंबीयांना सल्ला दिला. त्यांनी तुनिशा आत्महत्या प्रकरणाला बालिश आणि मुर्खपणा म्हटले आहे.

तो म्हणतो की हे लव्ह जिहादचे प्रकरण नाही. प्रत्येक खानने असं काम करावं असे नाही. बालिश वयाच्या टप्प्यावर घडलेल्या घटनांमुळेच हे घडत आहे. तुनिशा निघून गेली. तिच्या प्रियकरावर आरोप केले जात आहेत. त्याला अटकही करण्यात आली आहे. पण त्यामागचं जे मूळ कारण आहे. त्याबाबत कोणीच बोलत नाही.

Also Read- जोखीममुक्त व्यवहारांसाठी रिझर्व बँकेचा 'डिजिटल रुपया'

हेही वाचा: Tunisha Sharma: 'कुछ तो गडबड है...'AICWA अधिकाऱ्याचा मोठा खुलासा

मुकेश खन्ना म्हणाले की, या प्रकरणात सर्वात मोठे दोषी हे पालक आहेत. विशेषतः मुलींचे पालक. मुले स्वतःची काळजी घेतात पण मुली हळव्या मनाच्या असतात. मुली आपल्या बॉयफ्रेंडला देव मानतात आणि जेव्हा तिला समोरची व्यक्ती फसवणूक करत असल्याचं कळतं तर तिच्या मनावर काय परिणाम होतं असेल याची कल्पना करा. तुनिषाने एक घातक निर्णय घेतला ज्यामुळे तिचं कुटुंब आणि टीव्ही इंडस्ट्रीला धक्का बसला आहे.