विशाखा सुभेदारला राज्यपालांच्या हस्ते 'स्त्री शक्ती राष्ट्रीय पुरस्कार' प्रदान

सोशल मीडियावर पोस्ट लिहित व्यक्त केला आनंद
vishakha subhedar
vishakha subhedar

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमातून प्रेक्षकांना खळखळून हसवणारी अभिनेत्री विशाखा सुभेदारला Vishakha Subhedar राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते 'स्त्री शक्ती राष्ट्रीय पुरस्कार' Stree Shakti National Award प्रदान करण्यात आला आहे. यावेळी विशाखासह इतर ११ गुणवंत महिलांना हा पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला, गायिका पलक मुच्छल, निशिगंधा वाड, कविता राऊत यांचाही समावेश आहे. विशाखाने सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत पुरस्काराचा आनंद व्यक्त केला. (Actress Vishakha Subhedar receives Stree Shakti National Award from the Governor of Maharashtra)

'स्वप्नवत.. प्रचंड आनंद.. आधी विश्वास बसत नव्हता. पण जेव्हा निमंत्रण पत्रिका हातात आली, तेव्हा खरं वाटलं. मलबार हिल राजभवनला जाण्याचा योग आला. लेकाला बरोबर घेऊन गेले होते. नेमकं महेशला काम होतं, अन्यथा तो ही आला असता. आईच्या डोळ्यातला आनंद, दादा वहिनीच्या डोळ्यामधलं प्रेम आणि पोराने म्हटलेलं एक वाक्य.. आई एकदम तुला राज्यपालांच्या हस्ते पुरस्कार घेताना पाहिलं आणि भरून आलं. नवरा फोनवरून सतत संपर्कात. तो ही जाम खूश. सासूबाई, जाऊबाई, आत्याबाई, नणंद बाई, भावंड,सगळ्या सगळ्यांचे कौतुकाचे फोन, मेसेज. मित्र मैत्रिणींचे फोन. शुभेच्छांचा वर्षाव. खूप खूप शब्दात न सांगता येणारा न मावणारा आनंद झालाय', अशी पोस्ट लिहित विशाखाने आनंद व्यक्त केला.

vishakha subhedar
'सारेगमप लिटिल चॅम्प्स'चे परीक्षक ओव्हर अँक्टिंगमुळे ट्रोल
vishakha subhedar
'चांगला हेतू असलेला एक तरी पक्ष मला दाखवा', सुमित राघवन भडकला

'मंडळी हे प्रेम आहे तुम्हा सर्वांचं, ज्यामुळे मी माझं काम जबाबदारीने पार पाडण्याचा कायम प्रयत्न करत असते. असंच प्रेम कलाकारावर राहू द्या', असं तिने पुढे लिहिलं. या पोस्टवर अनेकांनी कमेंट्स करत विशाखाला शुभेच्छा दिल्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com