Kartik Aaryan: 'पठाण' चा रेकॉर्ड ब्रेक करणार कार्तिकचा 'शेहजादा'?,रिलीज आधीच सिनेमानं खिशात टाकले इतके करोडKartik Aaryan 'Shehzada' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kartik Aaryan 'Shehzada'

Kartik Aaryan: 'पठाण' चा रेकॉर्ड ब्रेक करणार कार्तिकचा 'शेहजादा'?,रिलीज आधीच सिनेमानं खिशात टाकले इतके करोड

Kartik Aaryan 'Shehzada Collection:'भूलभूलैय्या २ नंतर कार्तिक आर्यनच्या चाहत्यांच्या संख्येत जबरदस्त वाढ झाली आहे. आता अभिनेता 'शहजादा' या आपल्या सिनेमाच्या माध्यमातून पुन्हा प्रेक्षकांचं मनसोक्त मनोरंजन करण्यासाठी येत आहे.

'शहजादा' अनेकदा अडचणीत सापडला पण कार्तिक त्याला सुखरुप रिलीज पर्यंत घेऊन आला. आता बातमी आहे की 'शहजादा' रिलीज आधीच बऱ्यापैकी कमवून बसला आहे.

कार्तिकच्या आधीच्या काही परफॉर्मन्सेसना पाहून आता 'शहजादा' कडून लोकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत.

समिक्षकांचे देखील म्हणणे आहे की 'शहजादा' विषयी कार्तिकच्या चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. त्यामुळे कार्तिकचा 'शहजादा' देखील 'भूलभूलैय्या २' नंतर भरघोस कमाई करेल अशी अपेक्षा ठेवणं चुकीचं ठरणार नाही.(Kartik Aaryan Shehzada collection before release)

ट्रेड अॅनलिस्ट निशित शॉ यांच्या मते,शहजादाचं बजेट ८५ करोड आहे. यामध्ये ६५ करोड प्रॉडक्शन कॉस्ट आणि पब्लिसिटी आणि जाहिरातींचा विचार केला तर त्यासाठी २० करोड खर्च झालेयत.

सिनेमाच्या रिकवरीचा विचार केला तर सिनेमानं रिलीज आधीच ६५ करोडचा बिझनेस केला आहे. ज्यामध्ये सिनेमाचे म्युझिक राइट्स,सॅटेलाइट राइट्स यांच्या १० करोड इतक्या किमतीचा समावेश आहे.

रिपोर्ट्सनुसार समोर आलं आहे की, शहजादा ओटीटी रिलीजसाठी देखील तयार आहे. सिनेमाच्या राइट्सना ४० करोडमध्ये नेटफ्लिक्सला विकलं गेलं आहे.

ओव्हरसीज राइट्सची किंमत ५ करोड बोलली जात आहे. या हिशोबानं पाहिलं तर सिनेमानं आतापासूनच ७६ टक्के बिझनेस केला आहे. जर कमाईच्या या आकड्यांना पाहिलं तर,सिनेमा हिट म्हणून जाहीर करायला फक्त ४० करोडचा बिझनेस रिलीज नंतर व्हायची गरज आहे.

तसं पाहिलं तर लोकांमध्ये कार्तिक आणि त्याच्या या सिनेमाविषयी क्रेझ आहे. पण 'पठाण'मुळे 'शहजादा'वर बराच परिणाम झाला आहे. 'पठाण'ला मिळालेलं यश पाहता 'शहजादा'ची रिलीज डेट बदलण्यात आली.

सुरुवातील शहजादा १० फेब्रुवारीला रिलीज केला जाणार होता. पण नंतर १७ फेब्रुवारी ही रिलीज डेट जाहीर करण्यात आली. शाहरुख खानच्या 'पठाण' मुळे 'शहजादा' कुठे दूर फेकला जाऊ नये म्हणून ही काळजी घेण्यात आली.

'शहजादा' सिनेमाला रोहित धवननं दिग्दर्शित केलं आहे. या सिनेमात कार्तिक आर्यन सोबत क्रिति सनन देखील आहे. हा सिनेमा साउथ स्टार अल्लू अर्जून आणि पूजा हेगडे यांच्या 'अला वैकुंठापुरामुलोचा' ऑफिशियल रीमेक आहे.