ब्लाॅग लिहून आदिनाथने दिले आजोबांना सरप्राईज

टीम इ सकाळ
रविवार, 18 जून 2017

फादर्स डे असल्यामुळे अनेक कलाकारांनी आपल्या वडिलांसोबतचे फोटो सोशल साइटवर पोस्ट केले. तर काहींनी आपल्या मुलांसोबत फोटो काढून आपल्या आवडीचा मेसेज लिहीला. याला अपवाद ठरला तो अभिनेता, निर्माता आदिनाथ कोठारे. 

मुंबई : फादर्स डे असल्यामुळे अनेक कलाकारांनी आपल्या वडिलांसोबतचे फोटो सोशल साइटवर पोस्ट केले. तर काहींनी आपल्या मुलांसोबत फोटो काढून आपल्या आवडीचा मेसेज लिहीला. याला अपवाद ठरला तो अभिनेता, निर्माता आदिनाथ कोठारे. 

 

फादर्स डेचे औचित्य साधून त्याने ब्लाॅग लिहायला सुरूवात केली. त्याने पहिला ब्लाॅग लिहीला असून, आपले आजोबा अंबर महादेव कोठारे यांच्या व्यक्तिमत्वाचे पैलू उलगडून दाखवताना आपल्या 94 वर्षीय आजोबांना फादर्स डेच्या शुभेच्छा दिल्या. यापुढे हा ब्लाॅग सतत अपडेट करण्याकडे त्याचा कल असेल. 

आदिनाथ एक उत्तम अभिनेता आहेच. शिवाय महेश कोठारे यांच्यासोबत आता कोठारे व्हिजनची धुरा तो समर्थपणे हाताळतो आहे. 

Web Title: Adinath kothare new blog esakal news