Adipurush Box Office Collection: सडकून टीका.. तरीही दणकून कमाई! आकडा पाहून डोळे फिरतील..

कमाईचे आकडे पाहून डोळे फिरतील..
Adipurush box office collection day 1 Prabhas Kriti Sanon starrer to earn 150 crore worldwide
Adipurush box office collection day 1 Prabhas Kriti Sanon starrer to earn 150 crore worldwidesakal

गेली काही दिवस वादाच्या भोवऱ्यात अडलेला 'आदिपुरुष' सिनेमा अखेर प्रदर्शित झाला आहे. संपूर्ण भारतात 'आदिपुरुष' चीच चर्चा आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी काल लोकांनी पहाटेपासूनच गर्दी केली.

पण जसजसा दिवस पुढे गेला तरी आदिपुरुषवर पुन्हा टीका होऊ लागली. लोकांनी या चित्रपटाकडून असलेल्या अपेक्षा भंग झाल्याचे सांगितले. चित्रपटातील व्हिएफएक्स, पात्रांचे कपडे, रावणाचा अवतार सगळ्यावरच लोक सडकून टीका करत आहे.

असे असले तरी हा चित्रपट नेमका काय आहे हे पाहण्यासाठी प्रेक्षकांची झुंबड उडाली. आणि 'चित्रपटाच्या ओपनिंगलाच जबरदस्त प्रतिसाद मिळाला. परिणामी बॉक्स ऑफिस वरही दणदणीत कमाई या चित्रपटाने केली. नुकतेच या चित्रपटाच्या कमाईचे विक्रमी आकडे समोर आले आहेत.

(Adipurush box office collection day 1 Prabhas Kriti Sanon starrer to earn 150 crore worldwide)

Adipurush box office collection day 1 Prabhas Kriti Sanon starrer to earn 150 crore worldwide
Video: 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्याने सुरू केलं स्वतःचं हॉटेल.. कधी, कुठे आणि कसे जाल या इथे..

सुपरस्टार प्रभास, क्रिती सेनॉन आणि सैफ अली खान यांचा 'आदिपुरुष' हा चित्रपट अखेर रिलीज झाला. यामध्ये दिग्दर्शक ओम राऊतने मराठी कलाकारांना देखील संधी दिली आहे. तसेच हा चित्रपट हिंदी, तेलुगू, तामिळ, कन्नड आणि मल्याळम या पाच भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे.

एकाच दिवशी तब्बल ६२०० स्क्रीन्सवर हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला. त्यापैकी केवळ हिंदी भाषेतच ४ हजार स्क्रीन्सवर 'आदिपुरुष' प्रदर्शित करण्यात आला. त्यामुळे या चित्रपटाने पहिल्याच दिवशी विक्रमी कमाई करत १०० कोटींचा गल्ला पार केला आहे.

नुकतीच याबाबतची आकडेवारी समोर आली आहे. 'आदिपुरुष'ने पहिल्या दिवशी सर्व रेकॉर्ड मोडीत काढले आहेत. केवळ भारतातच या चित्रपटाने शुक्रवारी ८५ ते ९० कोटींची कमाई केल्याचे बोलले जात आहे. अद्याप अधिकृत आकडा समोर आलेला नाही, परंतु झालेली अॅडवान्स बूकिंग आणि एकूण कलेक्शनचा अंदाज यावर हे आकडे काही माध्यमांनी जाहीर केले आहे.

Adipurush box office collection day 1 Prabhas Kriti Sanon starrer to earn 150 crore worldwide
Adipurush: जलेगी भी तेरे बाप की.. हनुमानाच्या तोंडी असले डायलॉग? 'आदिपुरुष'वर भडकले प्रेक्षक

'आदिपुरुष'ने फक्त हिंदीत ४० ते ४५ कोटींची कमाई केल्याचं सांगितलं जातंय. याशिवाय प्रभासचे दाक्षिणात्य चाहते मोठ्या संखेने असल्याने दाक्षिणात्य प्रेक्षकांनीही चित्रपटाला जोरदार प्रतिसाद दिला.


शिवाय हा चित्रपट एकाचवेळी परदेशातही प्रदर्शित करण्यात आला. जगभरात ही काल २००० हून अधिक स्क्रीनवर हा चित्रपट झळकला, त्यामुळे भारता बाहेरही या चित्रपटाने ३५ ते ४० कोटींची कमाई केल्याचे समोर आले आहे.

त्यामुळे ५०० कोटींचे बजेट असलेल्या या चित्रपटाने पहिल्याच दिवशी १५० कोटींचा टप्पा पर केल्याचे दिसून येत आहे. येत्या दोन दिवसात वीकएंडमुळे हा चित्रपट आणखी दमदार कमाई करेल अशी खात्री व्यक्त करण्यात येत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com