Adipurush Controversy : 'हनुमान काय बजरंग दलाचा कार्यकर्ता आहे का?' काहीही दाखवता राव!

छत्तीसगढमध्ये आयोजित एका कार्यक्रमात मुख्यमंत्री भुपेश बघेल यांनी आदिपुरुषविषयी प्रतिक्रिया दिली आहे.
Adipurush Controversy chattisgarh CM Bhupesh
Adipurush Controversy chattisgarh CM Bhupesh esakal

Chattisgarh cm bhupesh baghel angry on adipurush : प्रसिद्ध दिग्दर्शक ओम राऊत यांच्या आदिपुरुषनं सध्या देशात वेगळ्याच प्रकारचे वातावरण निर्माण केले आहे. या चित्रपटानं प्रेक्षकांची मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त केली असून त्यामुळे अनेकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. यासगळ्याची राजकीय वर्तुळात देखील चर्चा होत आहे. छत्तीसगढचे मुख्यमंत्री भुपेश बघेल यांची प्रतिक्रिया चर्चेत आली आहे.

छत्तीसगढमध्ये आयोजित एका कार्यक्रमात मुख्यमंत्री भुपेश बघेल यांनी आदिपुरुषविषयी प्रतिक्रिया दिली आहे. जी खूप चर्चेतही आली आहे. ते म्हणतात की, हिंदू देवतांचा अपमान केला गेला आहे. यावेळी बघेल यांनी हनुमान यांच्या तोंडी जे संवाद आहेत ते काही बजरंग दलाचे कार्यकर्ते होते का, त्या संघटनेत असल्यासारखे संवाद त्यांना दिले आहेत. हे चूकीचे आहे. यासगळ्यात हिंदू देवतांचा अपमान करण्यात आला आहे आणि हे सहन केले जाणार नाही.

Also Read - Success Story : अन् त्याने शिक्षणासाठी डोंगरावर मात केली सचिनचा संघर्ष वाचायलाच हवा

बजरंग बलीला अँग्री बर्डच्या रुपात दाखवण्यात आले आहे. ज्ञान आणि भक्तीचे प्रतिक असणाऱ्या हनुमानजींना जाणीवपूर्वक रागीट दाखवण्यात आले आहे. त्यात त्यांचे डोळे आणि केशरचना ही पूर्णपणे वेगळी आहे. आम्ही अशा प्रकारच्या चित्रपटाची अपेक्षाच केली होती. या चित्रपटानं आमच्या मनात जे रामायण आहे त्याची तोडफोड केली आहे. अशी प्रतिक्रिया बघेल यांनी दिली आहे.

भुपेश बघल यांनी त्यांच्या ट्विटरवर याविषयी पोस्ट लिहिली आहे.त्यात ते म्हणतात की, मी त्या आदिपुरुष नावाच्या चित्रपटाविषयी ऐकले आणि वाचले. ते पाहून मला तर खूप वेदना झाल्या आहेत. वाईटही वाटले आहेत. सेन्सॉर बोर्डानं या चित्रपटाला पास कसे केले आहे हा प्रश्न पडतो आहे. त्यांनी या चित्रपटाला सर्टिफिकेट कसे दिले हा प्रश्न पडतो. आमच्या भावनांशी खेळण्याचा प्रकार निर्मात्यांनी केला आहे. त्यांनी आमच्या मनातील श्रीराम यांच्या प्रतिमेची मोडतोड केली आहे.

यासगळ्या प्रकाराचा केंद्र सरकारला जाब द्यावा लागेल. अशा प्रकारची कलाकृती तया करुन त्यांनी काय साध्य करण्याचा प्रयत्न केला आहे हेही सांगावे. खूप मोठ्या प्रमाणात त्याची लोकप्रियता वाढविण्याचा प्रयत्न केला गेला. आता मात्र लोकं त्या कलाकृतीवर नाराज झाली आहेत. आम्ही आमच्या मनात असणाऱ्या रामाचा झालेला अपमान सहन करणार नाही. असेही भुपेश यांनी म्हटले आहे.

Adipurush Controversy chattisgarh CM Bhupesh
Viral Video : बाथरूममध्ये अंघोळीला गेला अन् दिसला महाकाय अजगर; थरारक घटना कॅमेऱ्यात कैद

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com