रावणाच्या वादानंतर 'Adipurush'मध्ये बदल होणार? दिग्दर्शक ओम राऊत भावूक

ओमनं एका मुलाखतीतून आदिपुरुषवर होत असलेल्या टीकेवर भावूक होत उत्तर दिले आहे.
Om Raut Adipurush
Om Raut Adipurush esakal

Adipurush Movie controversy: आदिपुरुषचा टीझर प्रदर्शित झाला आणि मोठ्या वादाला सुरुवात झाली. दिग्दर्शक ओम राऊतवर नेटकऱ्यांनी आगपाखड करण्यास सुरुवात केली. त्या टीझरवरुन राजकीय नेत्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या. भाजपनं, हिंदू महासभेनं तर हा चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही. अशी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्याचा परिणाम येत्या काळात या चित्रपटाच्या प्रदर्शनावर होऊ शकतो. अशी भीती काहींनी व्यक्त केली आहे. यासगळ्यात ओमनं एका मुलाखतीतून आपली भूमिका मांडली आहे.

* आपल्यासाठी प्रेक्षक सगळ्यात महत्वाचे....

त्या मुलाखतीमध्ये ओम म्हणाला की, काही झालं तरी प्रेक्षक सगळ्यात जास्त महत्वाचे आहे. न्युज 18 ला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये ओमनं म्हटलंय, आमच्यावर विश्वास ठेवा तुम्हाला नाराज करणार नाही. आमच्याकडे प्रेक्षकांकडून ज्या सुचना आल्या आहेत त्यावर आम्ही विचार करणार आहोत. 12 जानेवारीला जेव्हा हा चित्रपट प्रदर्शित होईल तेव्हा आम्ही कुणाला निराश करणार नाही. अशा शब्दांत ओमनं आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

Om Raut Adipurush
Disha Patani Father: दिशाच्या पपांना व्हायचंय 'महापौर'! टाईट फिल्डिंग

*चित्रपट पाहून कुणी निराश होणार नाही....

आदिपुरुषवरुन होणारा वाद पाहता चित्रपटामध्ये काही बदल करणार का असा प्रश्न ओम राऊतला विचारण्यात आला तेव्हा तो म्हणाला, आम्ही आता फक्त 95 सेकंदाचा टीझर तयार केला आहे. त्यावरुन मोठा वाद सुरु झालाय. मी परत एकदा सांगतो चाहते, प्रेक्षक यांच्या ज्या भावना आहेत त्याचा आदर करुन योग्य तो निर्णय घेतला जाईल. त्यांना मी निराश करणार नाही. दोन दिवसांपूर्वी आदिपुरुषवरुन एकानं दिल्ली कोर्टामध्ये याचिका दाखल केली आहे. त्यामुळे दिग्दर्शक राऊत यांच्या डोकेदुखील आणखी वाढ झालीय. आदिपुरुषमध्ये सैफ अली खाननं रावणाची, प्रभासनं भगवान राम यांची तर क्रितीनं सीतेची भूमिका साकारली आहे.

Om Raut Adipurush
PS 1 Row: 'त्यावेळी हिंदू धर्मच नव्हता'! कमल हासन आऊट ऑफ कंट्रोल!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com