Adipurush Review Om Raut Director Prabhas As Ram
Adipurush Review Om Raut Director Prabhas As Ram esakal

Adipurush Review : वेगळेपणाच्या नावाखाली फसलेला 'आदिपुरुष'! सगळं गंडलयं...

Adipurush Review : प्रभास, सैफ अली खान, क्रिती सेनॉन, देवदत्त नागे सारखी स्टारकास्ट आदिपुरुषमध्ये असून हा चित्रपट ज्या तीव्रतेनं लक्षवेधक व्हायला हवा होता तेवढा तो झाला नाही.

Adipurush Review Om Raut Director Prabhas As Ram : एखादी गोष्ट जर तुम्हाला गेल्या शेकडो वर्षांपासून माहिती असेल आणि त्या गोष्टीमध्ये बदल करुन तुम्हाला ती पुन्हा सांगितल्यास तुम्हाला ती आवडेल का, समजा जे बदल चालू घडामोडींशी सुसंगत असल्यास एकवेळ आपण समजून घेऊ शकतो पण अनेकदा काही वेगळी मांडणी करायची म्हणून किंवा लक्ष वेधून घ्यायचे म्हणून करायला गेल्यास जे हसं होतं ना ते प्रसिद्ध दिग्दर्शक ओम राऊत दिग्दर्शित आदिपुरुषचे झाले आहे. Adipurush Review

रामायण ही अशी गोष्ट आहे जी प्रत्येकाला माहिती आहे. निदान त्यातील काही मुळ गोष्टी तर कित्येकांच्या मनात घर करुन आहेत. कोण कुणाचे कोण, त्यांची भूमिका काय, कोण शत्रू, कुणी काय केले, कसे केले, कुणी कुणाचा बदला घेतला याबद्दल काही वेगळं सांगण्याची गरज नाही.

निदान रामायणाच्याबाबत देखील तुम्ही काही लिबर्टी घेण्याचा विचार करु नये. नाहीतर वेगवेगळ्या वादाला सामोरं जाण्याची शक्यताच अधिक आहे. गेल्या दोन वर्षांहून अधिक काळ ज्या चित्रपटाची प्रेक्षक आतूरतेनं वाट पाहत होते तो आदिपुरुष आता थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे.

Also Read - Success Story : अन् त्याने शिक्षणासाठी डोंगरावर मात केली सचिनचा संघर्ष वाचायलाच हवा

ओम राऊत यांच्या यापूर्वीच्या तान्हाजी वरील चित्रपटाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. त्यांच्या लोकमान्य टिळक यांच्या आयुष्यावरील चित्रपटाचे प्रेक्षकांनी कौतूक केले होते. त्यामुळे रामायणावर आधारित चित्रपटाचे त्यानं जे शिवधनुष्य पेलले त्यात तो यशस्वी होईल असे अनेकांना वाटले होते.

मात्र या चित्रपटानं बऱ्याचअंशी निराशा केली आहे हे ठामपणे म्हणावे लागेल. त्याला कारण दिग्दर्शकानं आपण जे रामायण लोकांना माहिती आहे ते न दाखवता त्याचे वेगळ्या प्रकारे सादरीकरण करतो आहोत असे म्हणत जे काही पडद्यावर आणले आहे ते पाहून हसावं की रडावं हे कळत नाही.

प्रभास, सैफ अली खान, क्रिती सेनॉन, देवदत्त नागे सारखी स्टारकास्ट आदिपुरुषमध्ये असून हा चित्रपट ज्या तीव्रतेनं लक्षवेधक व्हायला हवा होता तेवढा तो झाला नाही.

मोशन पिक्चर सारख्या वेगळया तंत्रज्ञानावर आधारित चित्रित झालेला हा चित्रपट तीन तास आपले मनोरंजन करण्याचा जो प्रयत्न करतो तो केविलवाणा म्हणावा लागेल. कारण सुरुवातीचे पहिली तीस मिनिटं आदिपुरुष जो वातावरण निर्मिती करतो ती कौतूकास्पद आहे. मात्र त्यानंतर जे सुरु होतं ते कमालीचं कंटाळवाणं आहे.

दिग्दर्शकानं सुरुवातीला जी श्रेयनामावली येते त्यामध्येच रामायणाची सुरुवात, राजा दशरथ, त्याच्या राण्या, अयोध्या, राम, रामाचा जन्म, आणि त्याचा वनवास याविषयी सांगून टाकले आहे. त्यानंतर दिग्दर्शक थेट बर्फांळ प्रदेशात बसलेल्या रावणाकडे येतो.

तिथे त्याला ब्रम्हा अमरत्वाचे वरदान देतात. मात्र त्यात एक अट सांगून जातात. त्याचे मरण कुठे, केव्हा आणि कुणाच्या हातून होणार याची भविष्यवाणी करतात. अर्थात ही सगळी स्टोरी प्रेक्षकांना माहिती आहे. यात नवीन काही नाही. मात्र दिग्दर्शक सातत्यानं जे सांगत होता की, मांडणी, सादरीकरण वेगळे आहे की, ते प्रेक्षकांच्या डोक्यावरुन जाते.

Adipurush Review Om Raut Director Prabhas As Ram
Adipurush Saif Ali Khan Look: 'आम्हाला रामापेक्षा रावणच आवडला!' सैफच्या लूकची पडली भुरळ

मांडणीत प्रमाणापेक्षा जास्त वेगळेपणा असल्यास काय होते याचे उदाहऱण म्हणून आता राऊत यांच्या आदिपुरुष यांच्याकडे पाहावे लागेल. त्यांनी अफाट खर्च करुन जी निर्मिती केली ती मध्यांतरानंतर कमालीची हास्यास्पद होते.

ज्यांनी हॉलीवूडचे काही अॅनिमेशनपट पाहिले असतील त्यांना आपण अजूनही व्हीएफएक्स आणि ग्राफीक्स यात किती मागे आहोत हे दिसून येईल. पाचशे कोटींचे बजेट असणाऱ्या या चित्रपटाचा प्रामुख्यानं भर हा ग्राफिक्सवरच होता. मात्र तो फारसा प्रभावी नाही. हे सांगावे लागेल.

Adipurush Review Om Raut Director Prabhas As Ram
Om Raut: बाबो! 'आदिपुरुष'चा दिग्दर्शक ओम राऊतला आलं 4 कोटीचं गिफ्ट.. काय आहे असं?

प्लॅनेट अॅप्स, गोरिला, किंग काँग सारखे चित्रपट ज्यांनी पाहिले असतील त्यांना यात काही नवीन वाटणार नाही. तीन तासांचा आदिपुरुष काही वेळानं कमालीचा रटाळवाणा वाटू लागतो.

बराच काळ पडद्यावर असलेला अंधार, त्यात तो निरस असा थ्री डी इफेक्ट निराशेत आणखी भर टाकतो. काही प्रसंग प्रभावी झाले आहेत. मात्र ते बोटावर मोजावे इतकेच आहेत. रामाची भूमिका करणारा प्रभास हाच मुळी इतका हतबल झालेला वाटतो की, आपण राम एवढा अगतिक कसा असू शकतो, असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही.

अॅक्शन सीनची गोष्टच वेगळी... (Adipurush Movie Action scene)

कलाकारांचा अभिनय हा बरा आहे. त्यात रामाच्या भूमिकेतील प्रभासनं निराशा केली असली तरी रावणाच्या भूमिकेतील सैफ अली खान भाव खाऊन गेला आहे. त्यानं ओम राऊतच्या तान्हाजी चित्रपटात साकारलेला उदयभानही भलताच प्रभावी होती.

या चित्रपटातही रावणाची भूमिका सैफनं मोठ्या ताकदीनं साकारली आहे. प्रेक्षक त्याच्या भूमिकेच्या प्रेमात पडले आहे. प्रभासला मागे सारत सैफनं स्वताची वेगळी छाप या चित्रपटाच्या निमित्तानं उमटवली आहे.

Adipurush Review Om Raut Director Prabhas As Ram
Adipurush Twitter Review: रामाच्या भक्तांनाच नव्हे तर अख्ख्या पब्लिकला कसा वाटला आदिपुरुष...

सीतेच्या भूमिकेतील क्रितीनं देखील चाहत्यांचे लक्ष वेधून घेण्यात यश मिळवले आहे. तिच्या आजवरच्या चित्रपटांपैकी आदिपुरुषमधील भूमिका चाहत्यांना निश्चित आवडणारी आहे.

हनुमंताच्या भूमिकेतील देवदत्त नागेनं प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन केले आहे. त्याचे काही प्रसंग विनोदी आहेत जे त्यानं खुबीनं साकारले आहेत. मात्र अनेकदा तो इतका विनोदी होतो की, बजरंग बली एवढे साधे असतील का, असा प्रश्न आपल्याला पडतो.

असं कसं चालेल, मग लोकं नावं ठेवणार नाहीत का...

आदिपुरुषमध्ये काही गोष्टी अशा आहेत ज्या सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली पचनी पडणं अवघड आहे. उदा. रावणाचे व्यक्तिमत्व जितके क्रुर, हिंसक दाखवता येईल त्यासाठी दिग्दर्शकानं केलेला प्रयत्न हा हास्यास्पद आहे.

जसे की, रावण हा अजगराचा मसाज घेत असतो. आता ही गोष्ट पडद्यावर पाहताना भयंकर विनोदी वाटते. रावणाचे जे सैनिक आहेत ते दिसायला एवढे विचित्र आहेत की, आपल्याला प्रश्न पडतो हे असं कसं...याशिवाय वानरसेनेचे जे अॅनिमेशन आहे ते फारसे प्रभाव पाडताना दिसत नाही.

अजय- अतूलची कमाल....(adipurush ajay atul song)

संगीतकार अजय अतुलनं मात्र गाणी आणि संगीत यामध्ये कमाल केली आहे. त्यामु्ळे काही अंशी का होईना आदिपुरुष हा प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यात यशस्वी होतो हे सांगावे लागेल.

जय श्रीराम, जय श्रीराम राजाराम नावाचे गाणे प्रभावी आहे. याशिवाय पार्श्वसंगीत देखील लक्ष वेधून घेणारे आहे. यापूर्वी सोशल मीडियावर देखील अजय अतूल यांच्या गाण्यांना मिळालेला प्रतिसाद मोठा होता. आदिपुरुषमधील गाणी चाहत्यांच्या पसंतीस पडली आहेत.

तुम्ही जर फार अपेक्षा ठेवून आदिपुरुषला जात असाल तर तसं करु नका. याचे कारण तुम्हाला मोठ्या निराशेला सामोरं जावं लागेल.

तंत्रज्ञानाच्या माध्यमातून नव्या युगातील रामायण कसे असू शकते, किंवा त्याचे सादरीकरण कशा प्रकारे केले जाऊ शकते याचा प्रयत्न दिग्दर्शक ओम राऊतनं केला आहे. त्याला काही अंशी यश आले आहे. बॉलीवूडच्या सेलिब्रेटींनी प्रदर्शनापूर्वी हजारो तिकीटांची खरेदीही करुन ठेवली आहे. याबरोबरच अॅडव्हान्स बुकींगही जोरात झाले आहे.

यासगळयात जितक्या अपेक्षेनं आदिपुरुषकडे पाहिले जात होते. त्या पूर्ण करण्यात दिग्दर्शकाला यश आलेले नाही. तो तंत्रज्ञानाच्या मदतीनं रामायण, त्यातील पात्रं, घटना यांची वेगळी मांडणी करायला गेला खरा, पण ती मांडणी एवढी हास्यापद होईल असे वाटले नव्हते. ही गोष्ट आवर्जून नमदू करावीशी वाटते.

चित्रपटाचे नाव - आदिपुरुष (Adipurush Movie)

दिग्दर्शक - ओम राऊत

कलाकार - प्रभास, सैफ अली खान, क्रिती सेनॉन, देवदत्त नागे, तेजस्विनी पंडित

रेटिंग - अडीच स्टार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com