Adipurush Teaser : VFX पाहून आदिपुरुषच्या टीझरवर चाहते नाखूश; म्हटले कार्टून

रामायणातील पौराणिक गाथेवर आदिपुरुष हा चित्रपट बनवला आहे
Adipurush Teaser News
Adipurush Teaser NewsAdipurush Teaser News

Adipurush Teaser News प्रभासच्या आदिपुरुष चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे. चाहते खूप दिवसांपासून टीझरची वाट पाहत होते. मात्र, टीझर आल्यानंतर चाहत्यांचा सगळा उत्साह थंडावला आहे. याचे कारण म्हणजे चित्रपटात वापरलेले खराब VFX. आदिपुरुषमधील सर्व दृश्ये एखाद्या ॲनिमेशन चित्रपटातील वाटत आहेत

आदिपुरुष संदर्भात #disappointed, #cartoon आणि #adipurushteaser सारखे हॅशटॅग ट्विटरवर ट्रेंड करत आहेत. अनेक युजर्सनी वानर सेनेतील माकडांच्या विविध प्रजाती दाखवल्यानेही राग व्यक्त केला आहे. दिग्दर्शकाने मूळ कथेप्रमाणे माकडांना अर्धे मानव आणि अर्धे माकड बनवायला हवे होते. नेटकऱ्यांनी सैफ अली खान आणि प्रभासलाही ट्रोल केले.

Adipurush Teaser News
Bigg Boss 16 : घरात चालणार बिग बॉसची गुंडगिरी! एकापाठोपाठ नवीन नियम

दिग्दर्शक ओम राऊत यांनी रामायणातील पौराणिक गाथेवर आदिपुरुष हा चित्रपट बनवला आहे. या चित्रपटाची कल्पना त्याला जपानी ॲनिमेटेड फिल्म रामायण पाहिल्यानंतर सुचली. कोरोनाच्या लॉकडाऊन दरम्यान आदिपुरुष ही कथा लिहिली. चित्रपटाचे बजेट ५०० कोटी असल्याचे सांगण्यात येत आहे. VFX च्या कामावर २५० कोटी खर्च झाल्याची माहिती आहे.

चित्रपटात सुपरस्टार प्रभास भगवान रामाच्या भूमिकेत दिसणार आहे. कृती सेनन सीतेच्या भूमिकेत आहे. सैफ अली खान रावण आणि सनी सिंह निज्जर लक्ष्मणच्या भूमिकेत आहेत. टीझरमध्ये राम रावणाशी युद्धाची तयारी करून लंकेला जात असल्याचे दाखवण्यात आले आहे. येथे कृती एक छोटीशी आणि सुंदर झलकही पाहायला मिळते. आदिपुरुष १२ जानेवारी २०२३ रोजी प्रदर्शित होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com