अदिती इनामदार गिर्यारोहकाच्या भूमिकेत 

वृत्तसंस्था
मंगळवार, 21 मार्च 2017

"पूर्णा' या चित्रपटात अदिती इनामदार ही पूर्णा मालावत या गिर्यारोहक मुलीची भूमिका साकारत आहे. पूर्णा हिने अवघ्या 13 व्या वर्षी माऊंट एव्हरेस्ट हे शिखर सर केले होते. त्याची कहाणी सांगणारा हा चित्रपट आहे. या चित्रपटासाठी 13 वर्षांच्या अदितीनेही कठोर मेहनत घेतली आहे. तिने उणे 15 डिग्री सेल्सियस तापमानात गिर्यारोहणाचे प्रशिक्षण घेतले. तिच्या मेहनतीने अदितीचे सहकलाकारही थक्क झाले आहेत. राहुल बोस निर्मित आणि दिग्दर्शित हा चित्रपट 31 मार्चला प्रदर्शित होणार आहे. यातील अदितीच्या भूमिकेविषयी सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. 

Web Title: aditi inamdar as a purna