Aditya Chopra on Nepotism: 'सर्व काही असूनही उदयला...', आदित्य चोप्रा पहिल्यांदाच बोलले नेपोटिझमवर

चित्रपटसृष्टीतील नेपोटिझमवर पहिल्यांदाच चित्रपट निर्माते आदित्य चोप्रा बोलले आहेत.
aditya chopra and uday chopra
aditya chopra and uday chopraSakal

गेल्या काही वर्षात चित्रपटसृष्टीतील नेपोटिझम हा एक महत्त्वाचा मुद्दा बनला आहे. विशेषत: जेव्हा कंगनाने करण जोहरच्या कॉफी विथ करण या चॅट शोमध्ये हा मुद्दा उपस्थित केला होता. यावर पहिल्यांदाच चित्रपट निर्माते आदित्य चोप्रा बोलले आहेत.

आदित्य यांनी त्यांचा भाऊ उदय चोप्राचे प्रकरण समोर आणले आणि सांगितले की, नेपोटिझम देखील त्याला स्टार बनवू शकले नाही. ते म्हणाले की उदय, जो एका उत्तम चित्रपट निर्मात्याचा मुलगा आहे पण तरीही हिंदी चित्रपटसृष्टीत ठसा उमटवू शकला नाही.

नेपोटिझमवर बोलताना आदित्य म्हणाले, “लोक ज्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतात, त्यापैकी एक म्हणजे विशिष्ट पार्श्वभूमीतून आलेले प्रत्येकजण यशस्वी होत नाही. मी इतर लोकांचा उल्लेख न करता ते स्पष्ट करू शकतो. मी माझ्या कुटुंबाचा उल्लेख करूनच हे स्पष्ट करू शकतो. माझा भाऊ अभिनेता आहे आणि तो फारसा यशस्वी अभिनेता नाही".

"तो एका मोठ्या चित्रपट निर्मात्याचा मुलगा आहे. तो एका मोठ्या चित्रपट निर्मात्याचा भाऊ आहे. विचार करा की YRF सारख्या कंपनीने इतके नवीन लोक लॉन्च केले आहेत, आम्ही त्यांना स्टार बनवू शकलो नाही. आपण ते स्वतःसाठी का करू शकलो नाही? मुख्य गोष्ट अशी आहे की 'मला ही व्यक्ती आवडते, मला ही व्यक्ती बघायची आहे' हे फक्त प्रेक्षक ठरवतील. आणखी कोणीही नाही."

aditya chopra and uday chopra
Ashutosh Gowariker Birthday: बॉलीवूडच्या दिग्दर्शकांना जशास तसं उत्तर देणारा 'मराठमोळा दिग्दर्शक'!

याविषयी उदय चोप्रा सांगतात की, त्यांनी आपल्या पहिल्याच चित्रपट 'मोहब्बतें'साठी कशी मेहनत घेतली, ज्यामध्ये शाहरुख खान आणि अमिताभ बच्चन मुख्य भूमिकेत होते. ते म्हणाले की आदित्य चोप्राने त्याला सांगितले की जर त्याला अभिनेता व्हायचे असेल तर त्याच्या नृत्यावर खूप मेहनत घ्यावी लागेल.

उदय म्हणाला की त्याच्यासाठी हे सगळं 'इतकं सोपं' होतं. धूममध्ये अभिनय केलेल्या उदयला त्याचे सहकलाकार अभिषेक बच्चन आणि हृतिक रोशन यांच्याकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

aditya chopra and uday chopra
Vijay Varma : व्हॅलेंटाईन डेला विजय वर्मानं तमन्नासोबतच्या नात्याला दिलं नाव?

डॉक्युमेंट्रीच्या शेवटी आदित्य म्हणाले, “हो, जर तुमचा जन्म फिल्मी कुटुंबात झाला असेल, तर ऑडिशन किंवा ब्रेक मिळणे सोपे असते यात शंका नाही. पण ते तिथेच थांबते.

उदय म्हणाला, “जेव्हा धूम आला, तेव्हा मी अजूनही मुख्य प्रवाहातील अभिनेता बनण्याचा प्रयत्न करत होतो. मी अलीचे उदाहरण घेऊन तशा भूमिका करायला हव्या होत्या.” तो पुढे म्हणाला, “मी जेव्हा अभिनय करायला सुरुवात केली तेव्हा मी खूप भोळा होतो. मला वाटले होते की प्रत्येकजण मला आवडेल. मला वाटले नव्हते ,लोकांना मी आवडणार नाही."

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com