आदित्य-श्वेताचा पार पडला रोका समारंभ, फोटो व्हायरल

aaditya shweta
aaditya shweta

मुंबई- काही दिवसांपूर्वीच प्रसिद्ध गायिका नेहा कक्कर आणि रोहनप्रीत सिंह यांचा लग्नसोहळा पार पडला. त्यानंतर आता आदित्य नारायण याच्या घरी लग्नाची लगबग सुरु झाली आहे. आदित्य आणि श्वेता यांच्या लग्न समारंभाची आता सुरुवात झाली आहे. नुकताच आदित्य आणि श्वेताचा रोका समारंभ पार पडला. आदित्यच्या एका फॅन पेजवर या दोघांच्या रोका समारंभाचे फोटो शेअर करण्यात आले आहेत.

आदित्य लवकरच प्रेयसी श्वेता अग्रवालशी लग्न करणार आहे. काही दिवसांपूर्वी आदित्यने सोशल मीडियावर श्वेतासोबत असलेल्या नात्याबाबत कबुली दिली होती. त्यानंतर आता या दोघांच्या घरी लग्नाची लगबग सुरु झाली आहे. विशेष म्हणजे लग्नाची तयारी करण्यासाठी आदित्यने काही काळ सोशल मीडियापासून लांब राहण्याचं देखील ठरवलं आहे. सध्या सोशल मीडियावर आदित्य- श्वेताच्या रोका समारंभाचा फोटो व्हायरल होत असून या फोटोमध्ये आदित्य आणि श्वेता या दोघांचे कुटुंबिय दिसून येत आहेत.

आदित्य प्रसिद्ध गायक उदित नारायण यांचा मुलगा असून तो देखील गायक आणि अभिनेता आहे. त्यासोबतच त्याने रिऍलिटी शो 'इंडियन आयडल'चं सूत्रसंचालनही केलं आहे. आदित्यची प्रेयसी श्वेता अभिनेत्री असून तिने काही दाक्षिणात्य सिनेमांमध्ये काम केलं आहे. आदित्य-श्वेताची भेट ‘शापित’ सिनेमाच्या सेटवर झाली होती.

aditya narayan and shweta agarwals wedding festivities begin see pics from their roka ceremony  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com