आदित्य नारायण.. चड्डी.. आणि काॅलेजमधलं निलंबन!

बुधवार, 4 ऑक्टोबर 2017

रायपूर एअरपोर्टवर दोन दिवसांपूर्वी आदित्य नारायणने घातलेला गोंधळ व्हायरल झालाय. विमानतळावर तिथल्या स्टाफसोबत वाद झाल्यानंतर दोघांत झालेली बाचाबाची शूट करून ती आॅनलाईन टाकण्यात आली. पण आता त्यापुढचा किस्सा झाला आहे. आदित्य काॅलेजमध्ये असतानाही असाच वागत होता, असा दावा त्याची बॅचमेट असणाऱ्या एका महिलेने ट्विटरवर केला आहे. 

मुंबई : रायपूर एअरपोर्टवर दोन दिवसांपूर्वी आदित्य नारायणने घातलेला गोंधळ व्हायरल झालाय. विमानतळावर तिथल्या स्टाफसोबत वाद झाल्यानंतर दोघांत झालेली बाचाबाची शूट करून ती आॅनलाईन टाकण्यात आली. पण आता त्यापुढचा किस्सा झाला आहे. आदित्य काॅलेजमध्ये असतानाही असाच वागत होता, असा दावा त्याची बॅचमेट असणाऱ्या एका महिलेने ट्विटरवर केला आहे. 

ओल्ड हॅबिटस डाय हार्ड असं सांगत ती म्हणते, आदित्य काॅलेजमध्ये असतानाही असाच हट्टी आणि भांडखोर होता. काॅलेजमधल्या सुरक्षारक्षकाशी वाद घातल्यानंतर त्याला एक आठवडाभर काॅलेजमधून काढून टाकण्यात आलं होतं. त्याचा रायपूर विमानतळावरचा व्हिडीओ पाहिल्यानंतर जुन्या सवयी कधीच जात नाहीत याची साक्ष पटली. 

आदित्यचं इंडिगो विमानाच्या ग्राउंड स्टाफसोबत कशावरून तरी वाजलं. त्यानंतर दोघांचा वाद विकोपाला गेला. अर्थात स्टाफपैकी कुणीच त्याच्याशी सौजन्य सोडून वागत नव्हतं. पण आदित्य मात्र कमालीचा संतापला होता. तू बघ.. तुझी चड्डी नाही काढली तर माझं नाव आदित्य नारायण नाही सांगणार असं बरळून आदित्य निघून गेला. सोशल मीडीयावर ही क्लीप बरीच व्हाय़रल झाली. 

Web Title: aditya narayan raipur airport esakal news

टॅग्स