Aditya Narayan Controversy : आदित्यनं रागात चाहत्याला माईक का फेकून मारला? मॅनेजरनं केला धक्कादायक खुलासा

आदित्य नारायणनं चाहत्याला रागाच्या भरात माईक फेकून मारला होता. त्यावर आता मॅनेजरनं खुलासा केला आहे.
Aditya Narayan Controversy
Aditya Narayan Controversyesakal

Aditya Narayan Controversy: बॉलीवूडमधील प्रसिद्ध गायक उदित नारायण यांचा मुलगा गायक आदित्य नारायण हा त्याच्या एका (Aditya Narayan Viral Video) व्हिडिओमुळे चर्चेत आला होता.त्यानं त्याच्या एका कॉन्सर्टच्या दरम्यान चाहत्याला रागानं माईक फेकून मारल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता.त्यावरुन आता आदित्यच्या मॅनेजरनं त्याबाबत खुलासा केला आहे.

आदित्यला एवढा का संताप आला होता की त्यानं थेट चाहत्यावर हल्ला (Aditya Narayan Latest News) केला, अशा आशयच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्हायरल झाल्या होत्या. काहींनी आदित्यवर त्या प्रकारामुळे तीव्र शब्दांत नाराजी देखील व्यक्त केली होती. असं काय घडलं की आदित्यला राग एवढा अनावर झाला, याविषयी मॅनेजरनं खुलासा केला आहे.

आदित्यचा तो व्हिडिओ छत्तीसगढमधील एका महाविद्यालयात आदित्यचा कॉन्सर्ट सुरु होता. त्यावेळी परफॉर्मन्स सुरु असताना त्यानं चाहत्यावर माईक फेकून मारल्याची घटना घडली. तो व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आदित्यवर वेगवेगळ्या प्रकारे टीका करण्यात आली होती. या सगळ्यात ज्यानं तो कॉन्सर्ट आयोजित करणाऱ्या इव्हेंट मॅनेजरनं खुलासा केला आहे.

काय म्हणाला मॅनेजर?

भिलईमधील त्या महाविद्यालयातील कॉन्सर्टमधून आदित्यचा तो व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यात तो चाहत्यांना अभिवादन करतो आहे. त्यावेळी त्यानं एका चाहत्याच्या हातावर मारत त्याला माईक फेकून मारत असल्याचे दिसून आले. यात त्या कॉन्सर्टच्या मॅनेजरनं झुम टीव्हीशी बातचीत करताना असे म्हटले आहे की, ज्यानं आदित्यसोबत गैरप्रकार केला तो काही त्या महाविद्यालयाचा विद्यार्थी नसून तो व्यक्ती बाहेरचा आहे.

Aditya Narayan Controversy
Poonam Pandey and Sam Bombay : पूनम पांडेसह पती सॅम बॉम्बे विरोधात '100 कोटीं'चा मानहानीचा दावा! काय आहे प्रकरण?

त्या कॉन्सर्टच्या वेळी आदित्यसोबत किमान दोनशे जणांनी सेल्फी काढला. तेव्हा ती व्यक्ती सातत्यानं आदित्यचा पाय ओढत होती. त्यानं त्याच्या फोननं आदित्यला मारण्याचा प्रयत्नही केला होता. आदित्यनं सुरुवातीला त्याकडे दुर्लक्ष केले. मात्र तो सारखाच त्रास देत असल्यानं त्याला राग अनावर झाला. असे त्या मॅनेजरनं सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com