Urfi Javed : उर्फी पापाराझींना म्हणाली, आज तुम्ही लोक आत जाईपर्यंत व्हिडिओ बनवा

उर्फी जावेदला अनेकदा विमानतळावर स्पॉट केले जाते
Urfi Javed Latest News
Urfi Javed Latest NewsUrfi Javed Latest News

Urfi Javed Latest News अभिनेत्री उर्फी जावेदचे फोटो आणि व्हिडिओ खूप व्हायरल होत आहेत. कोणी तिची स्तुती करतो तर कोणी ट्रोल. यामुळे ती नेहमी चर्चेत राहतो. रणवीर सिंगनेही उर्फीच्या फॅशन सेन्सचे कौतुक केले आहे. उर्फीला भरपूर प्रेम मिळत असतानाच खूप ट्रोलही केले जाते. उर्फी ट्रोल करणाऱ्यांना सडेतोड उत्तरही देत असते. आता उर्फी जावेदने पुन्हा एकदा ट्रोल करणाऱ्यांवर निशाणा साधला आहे. व्हिडिओमध्ये विमानतळावर तिच्या आगमनाच्या टिप्पण्यांवर प्रतिक्रिया दिली आहे.

व्हायरल व्हिडिओत उर्फी जावेद एअरपोर्टवर दिसली. आज तुम्ही लोक मी आत जाईपर्यंत व्हिडिओ बनवाल. मी आत गेली आहे हे दाखवण्यासाठी आत जातपर्यंतचा व्हिडिओ बनवा. तिकीट दाखवू... कुणाला माझे तिकीट बघायचे आहे का?, अशी ती व्हिडिओत म्हणताना दिसत आहे.

उर्फी जावेदला अनेकदा विमानतळावर स्पॉट केले जाते. काही ट्रोलर्सनी उर्फी फक्त विमानतळावर जाते, असे म्हटले होते. यामुळे तिने पापराझींना विमानात बसेपर्यंतचा व्हिडिओ काढण्याची मागणी केली. याआधीही उर्फी जावेदनने ट्रोल करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिले होते.

Urfi Javed Latest News
Mukesh Khanna : एकता कपूर तू सासू-सुनेचे शो बनवून टीव्ही नष्ट केला; पुन्हा संतापले

उर्फी जावेदने इंस्टाग्रामवर व्हिडिओ शेअर केला होता. व्हिडिओमध्ये उर्फी जावेद डिस्को थीममध्ये दिसली होती. तिने डिस्को बॉल स्टाईलमध्ये चेहरा झाकला होता. काही सोशल मीडिया युजर्सनी उर्फीच्या स्टाइलचे कौतुक केले तर काहींनी ट्रोल केले. व्हिडिओमध्ये उर्फीचा चेहरा झाकलेला असल्याने काही कमेंटमध्ये लोकांनी तिला महिला राज कुंद्रा असेही म्हटले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com