शाहरुख, आमीरचे 25 वर्षांनी एकत्र छायाचित्र

वृत्तसंस्था
शनिवार, 11 फेब्रुवारी 2017

आमीरच्या 'दंगल' आणि शाहरुखच्या 'रईस' या चित्रपटांना प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. आता आमीर आगामी 'ठग्स ऑफ हिंदुस्तान' या चित्रपटात दिसणार आहे.

मुंबई - बॉलिवूडमधील सुपरस्टार अशी ओळख असलेले किंग खान शाहरुख खान आणि मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खान यांच्यात तब्बल 25 वर्षांनी एकत्र छायाचित्र घेण्याचा योग जुळून आला आहे. शाहरुखने ट्विटरवर आमीरसोबतचे छायाचित्र प्रसिद्ध केले.

दुबईत उद्योजक अजय बिजली यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात आमीर आणि शाहरुख एकत्र आले होते. यावेळी शाहरुखने आमीरसोबतचे छायाचित्र ट्विटरवर अपलोड करताना म्हटले आहे, की आम्ही एकमेकांना गेल्या 25 वर्षांपासून ओळखतो. पण, आता पहिल्यांदाच एकत्र छायाचित्र घेत आहोत. शुक्रवारची रात्र खूप मजेशीर होती.

आमीरच्या 'दंगल' आणि शाहरुखच्या 'रईस' या चित्रपटांना प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. आता आमीर आगामी 'ठग्स ऑफ हिंदुस्तान' या चित्रपटात दिसणार आहे. आमीरच्या या चित्रपटातील भूमिकेच्या लूकमध्ये छायाचित्रात दिसत आहे. शाहरुखने यापूर्वी सलमान खान सोबतची अनेक छायाचित्रे प्रसिद्ध केली आहेत.

Web Title: After 25 years, Aamir-SRK ‘break’ the internet with their first picture together