
रियाने तिचा फोन ईडीकडे जमा केला होता. त्यातून आता अनेक धक्कादायक बाबी समोर येत आहेत. रिया ८ जूनला सुशांतच्या घरातून निघून गेल्यानंतर १३ जून पर्यंत कोणा कोणाच्या संपर्कात होती हे आता समोर आलं आहे.
मुंबई- सुशांतसिंह राजपूत मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात रिया चक्रवर्तीची ईडी कसून चौकशी करत आहे. रियाने तिचा फोन ईडीकडे जमा केला होता. त्यातून आता अनेक धक्कादायक बाबी समोर येत आहेत. एका प्रसिद्ध वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, रियाच्या कॉल डिटेल्सचा खुलासा झाला आहे. रिया ८ जूनला सुशांतच्या घरातून निघून गेल्यानंतर १३ जून पर्यंत कोणा कोणाच्या संपर्कात होती हे आता समोर आलं आहे.
हे ही वाचा: 'देवी तिथे जागृत आहे' म्हणत केदार शिंदेंनी व्यक्त केली न्युझिलँडला जाण्याची इच्छा
रिया चक्रवर्तीबाबत दररोज एक ना अनेक गोष्टींचे खुलासे होत आहेत. रियाचा फोन आणि लॅपटॉप ईडीने जप्त केला आहे. मिडिया रिपोर्ट्सनुसार, ८ जून रोजी म्हणजेच ज्या दिवशी रिया सुशांतच्या घरातून निघून गेली त्यानंतर ती दिग्दर्शक महेश भट्ट यांच्या संपर्कात होती. डेटा रिपोर्टमधून हा देखील खुलासा झाला आहे की तिने एका प्रसिद्ध बॉलीवूड दिग्दर्शकाकडे एका पत्रकाराचा नंबर मागितला होता ज्यामुळे ती त्या पत्रकाराला सांगून तिच्या बाबतीत सकारात्मक बातम्या करुन घेऊ शकेल.
मिळालेल्या माहितीनुसार, रिया चक्रवर्तीने ८ जून ते १३ जून दरम्यान दिग्दर्शक महेश भट्ट यांच्यासोबत अनेकदा बोलणं झालं होतं. यातील ९ फोन आऊटगोईंग होते तर बाकी इनकमिंक होते. ईडीच्या सुत्रांनुसार, ८ जून ते १३ जून दरम्यान रिया आणि महेश भट्ट यांच्यामध्ये अचानक जास्त संभाषण व्हायला लागलं होतं. रिया चक्रवर्तीसोबतंच तिचा भाऊ शौविक चक्रवर्तीची देखील ईडीने चौकशी केली आहे. तसंच रियाची मॅनेजर श्रुती मोदी आणि फ्लॅटमेट सिद्धार्थ पिठानी यांना देखील ईडीने चौकशीसाठी बोलवलं होतं. सुशांत प्रकरणाचा तपास आता सीबीआय करत आहे.
after 8 june rhea chakraborty made several calls to mahesh bhatt and top bollywood director