घटस्फोटानंतर करिश्माला मिळते एवढी पोटगी

करिश्माने चित्रपटसृष्टीला अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत.
Actress Karishma Kapoor
Actress Karishma KapoorTeam esakal

बॉलिवूडमधील अभिनेत्री करिश्मा कपूर Karisma Kapoor हिने नव्वदीचा काळ गाजवला आहे. करिश्माने चित्रपटसृष्टीला अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. काही वर्षांपासून तिने चित्रपटसृष्टीपासून ब्रेक घेतला असून ती सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. करिश्माने २००३ मध्ये उद्योजक संजय कपूरशी Sanjay Kapoor लग्नगाठ बांधली. पण तिचं हे लग्न फार काळ टिकलं नाही. करिश्माने दिल्लीचा उद्योजक संजय कपूर याच्याशी लग्न केल्यानंतर मोठ्या पडद्यापासून दूर राहणं पसंत केलं. तिच्या लग्नाच्या पाच-सहा वर्षानंतर त्यांच्यामध्ये वादविवाद सुरू झाले. करिश्मा आणि संजयचा घटस्फोट हा बॉलिवूडच्या इतिहासातील सर्वात महागड्या घटस्फोटापैकी एक म्हणून ओळखला जातो.

एका रिपोर्टनुसार, करिश्माला संजय कपूरने घटस्फोटावेळी मोठी रक्कम दिली होती. मुलाच्या खर्चांसाठी त्याने १४ कोटींचा बाँड केला तर, तो करिश्मा कपूरला दर महिना १० लाख रुपये देतो, असं म्हटलं जातं. करिश्माकडे मुलांचा ताबा असतानाही संजय कपूर त्यांच्या मुलांवर लाखो रुपये खर्च करतो.

Actress Karishma Kapoor
'मन उडू उडू झालं' इंद्रा-दिपूनं घेतली राज ठाकरेंची भेट

बॉलिवूडमध्ये कपूर कुटुंबाचे प्रचंड वर्चस्व आहे. या कुटुंबातून आलेला प्रत्येक व्यक्ती चित्रपटसृष्टीत चमकला आहे. तर करिश्मा ही कपूर कुटुंबातील पहिली मुलगी आहे. याआधी कुटुंबातील मुलींना चित्रपटसृष्टीत काम करण्याची परवानगी नव्हती. मात्र, तिने जिद्दीने बॉलिवूडमध्ये प्रवेश केला आणि आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये स्थान देखील मिळवले.

करिश्माने गोविंदा, अक्षय कुमार, सलमान खान, शाहरूख खान या कलाकारांसह अनेक सुपरहिट चित्रपट केले आहे. तर तिला दिल तो पागल है या चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. करिश्मा ही शेवटी मेन्टलहूड या वेब सीरिजमध्ये दिसली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com