घटस्फोटानंतर समंथा नागार्जुनच्या भेटीला; कारण...

काही दिवसांपूर्वी नागा चैतन्य आणि समंथाने विभक्त होण्याचा निर्णय घेतला.
Samantha and Nagarjuna
Samantha and Nagarjunafile view

दाक्षिणात्य अभिनेत्री समांथा रुथ प्रभू ही गेल्या काही दिवसांपासून तिच्या कामासोबतच तिच्या वैयक्तीक आयुष्यामुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच समांथाने पती नागा चैतन्यसोबत विभक्त होण्याचा निर्णय घेतला होता. घटस्फोटानंतर समांथा मैत्रीणीसोबत फिरायला गेली होती आणि तेथून आल्यावर समांथाने एक्स सासरे म्हणजेच नागार्जुनची भेट घेतली.

समांथाने नागार्जुनच्या हैदराबाद येथील अन्नपूर्णा स्टूडिओमध्ये जाऊन त्यांची भेट घेतली. त्यावर अनेकांनी समांथा आणि नागार्जुनमध्ये चांगले नाते असल्यामुळे भेट घेतली असल्याचे म्हटलं तर काहींनी समांथा नागार्जुनच्या आगामी चित्रपटामध्ये काम करणार असल्यामुळे भेट घेतल असल्याचं म्हटलं आहे. समांथा आणि नागार्जुनच्या भेटीचे खरे कारण म्हणजे तिचा आगामी तेलुगू चित्रपट ‘शकुंतलम.’ या चित्रपटात ती मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटातील भूमिकेच्या डबिंगसाठी ती अन्नपूर्णा स्टूडिओमध्ये गेल्याचं समोर आलं आहे. तेव्हा तिथे ती नागार्जुनला भेटली असल्याचं सांगितल जात आहे.

समांथा लवकरच तेलुगू चित्रपट शकुंतलम आणि तमिळ चित्रपट काठू वकालु रेंदु कधालमध्ये दिसणार आहे. या चित्रपटाच समांथा रुथ प्रभू सुपरस्टार विजय सेतुपतीसोबत दिसणार आहे. तसेच ती राज एण्ड डीके यांच्या आगामी प्रोजेक्टमध्ये झळकणार आहे. २००९ मध्ये ‘ये माया चेसावे’ या तेलुगू चित्रपटाच्या सेटवर समांथा व नागा चैतन्यची पहिली भेट झाली. त्यावेळी नागा चैतन्य कमल हासन यांची मुलगी श्रुती हसनला डेट करत होता. तर दुसरीकडे समांथा व ‘रंग दे बसंती’ फेम अभिनेता सिद्धार्थ रिलेशनशीपमध्ये होते. चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान समांथा व नागा चैतन्यमध्ये चांगलीच मैत्री झाली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com