Onkar Bhojane: एकमेकांबद्दल द्वेष वाटावा.. हास्यजत्रा सोडल्यानंतर ओंकार भोजने गौरव मोरे बद्दल जरा स्पष्टच म्हणाला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

onkar bhojane , gaurav more, maharashtrachi hasyajatra

Omkar Bhojane: एकमेकांबद्दल द्वेष वाटावा.. हास्यजत्रा सोडल्यानंतर ओंकार भोजने गौरव मोरे बद्दल जरा स्पष्टच म्हणाला

Onkar Bhojane - Gaurav More News: महाराष्ट्राची हास्यजत्रा मधील प्रेक्षकांचा लाडका अभिनेता म्हणजे ओंकार भोजने आणि गौरव मोरे. गौरव आणि ओमकारची जोडी महाराष्ट्राची हास्यजत्रा मध्ये सगळ्यात चर्चेत राहिली.

दोघांचं मामा - भाचा स्किट असो कि भावजी आणि मेव्हणा यांचं धम्माल स्किट असो. प्रेक्षकांनी ओंकार - गौरववर मनापासून प्रेम केलं. ओंकारने महाराष्ट्राची हास्यजत्रा शो सोडला आणि प्रेक्षक या दोघांच्या जोडीला मिस करत आहेत. हास्यजत्रा सोडल्यानंतर ओंकार गौरवबद्दल जरा स्पष्टच म्हणाला.

ओंकारचा सरला एक कोटी सिनेमा काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला. हा सिनेमा प्रेक्षक आणि समीक्षकांच्या संमिश्र प्रतिसादात सुरु आहे. या सिनेमाच्या निमित्ताने ओंकार विविध मुलाखतीत हास्यजत्रेच्या कलाकारांबद्दल आठवणी जागवत आहे. अशाच एका मुलाखतीत ओंकारने गौरव मोरे बद्दल त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

ओंकार म्हणाला,"'गौरव आणि माझ्या दोघांच्या करिअरची सुरुवात एकांकिकेपासूनच झाली. गौरव माझा सिनिअर आहे. मी एकदा सवाई एकांकिका पाह्यला गेलो होतो. तिथे गौरवची 'पडद्याआड' ही एकांकिका पाहून मी सुन्न झालो.

मला गौरवचा अभिनय प्रचंड आवडला. दुसऱ्या दिवशी मी गौरवला त्याच नाट्यगृहाबाहेर भेटलो आणि तुझी एकांकिका छान होती असं मी त्याला म्हणालो. आपण कधीतरी एकत्र काम करू असं गौरवला ओंकार म्हणाला.

पण त्यानंतर योगायोगाने गौरव आणि ओंकार यांची महाराष्ट्राची हास्यजत्राच्या मंचावर भेट झाली. तेव्हा ओंकारने गौरवला त्या दिवसाची आठवण करून दिली. ओंकार पुढे म्हणाला."आम्ही कामाशिवाय एकमेकांशी बोलत नाही.

एकमेकांचे मित्र नाही. हो पण एकमेकांचा राग यावा आणि एकमेकांचा द्वेष वाटावा असं आमच्यात काही नाही." अशाप्रकारे ओंकारने गौरव आणि त्याच्या मैत्रीवर भाष्य केलं.

ओंकार भोजनेची प्रमूख भूमिका असलेला सरला एक कोटी सिनेमा महाराष्ट्रात हाऊसफुल्ल गर्दीत सुरु आहे. या सिनेमाचा दमदार चौथा आठवडा सुरु झालाय. सिनेमात ओंकार भोजने सोबत छाया कदम आणि इशा केसकर हे कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत. २० जानेवारी २०२३ ला हा सिनेमा महाराष्ट्रात प्रदर्शित झालाय.