Onkar Bhojane: ओंकार भोजनेला परत आणा.. सोशल मीडियावर चाहत्यांकडून जोरदार मागणी.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

fans want see onkar bhojane again in maharashtrachi hasyajatra show on sony marathi

Onkar Bhojane: ओंकार भोजनेला परत आणा.. सोशल मीडियावर चाहत्यांकडून जोरदार मागणी..

Onkar Bhojane: गेल्या काही दिवसात एक अभिनेता प्रचंड चर्चेत आहे तो म्हणजे ओंकार भोजने. सोनी मराठी वरील 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमातून आपल्या भेटीला आलेल्या या कलाकाराने अल्पवधीतच प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केलं. पण हास्यजत्रा सोडल्यानंतर त्यावर सडकून टीकाही झाली. लोकांनी त्यावर नाना आरोप केले. आता चाहत्यांनी पुन्हा एकदा त्याच्या नावाचा गजर सुरू केला आहे. त्याचे कारणही तसेच आहे.

(fans want see onkar bhojane again in maharashtrachi hasyajatra show on sony marathi )

हेही वाचा: Bigg Boss Marathi 4: किरण खोटारडा.. तर अमृता विश्वासघातकी, दुतोंडी.. दोघांमध्ये खडाजंगी

आपल्या अभिनयाने आणि दमदार विनोदाने ओंकार भोजनेने महाराष्ट्रातील रसिकांच्या मनावर अधिराज्य केलं. गेली काही वर्षे ओंकारने आपल्याला सोनी मराठीवरील 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमातून खळखळून हसवले. या कार्यक्रमाचा आणि पर्यायाने ओंकार भोजनेचा देखील चाहतावर्ग मोठा आहे. पण काही दिवसांपूर्वी त्याने एक धक्कादायक निर्णय घेतला आणि तो झी मराठी वरील 'फू बाई फू' या कार्यक्रमात गेला. त्यावरून त्याच्यावर टीका देखील झाली. आता 'फू बाई फू' कार्यक्रम लवकरच बंद होणार आहे. त्यामुळे ओंकार कुठेच दिसणार नसल्याने त्याचे चाहते हवालदिल झाले आहेत.

ओंकार सध्या दोन्ही कार्यक्रमांमधून बाहेर आहे अशी परिस्थिती आहे. त्यामुळे तो कुठेच दिसणार नसल्याची चाहत्यांना खंत आहे. अनेकांनी त्याचा 'फू बाई फू' मध्ये जाण्याचा निर्णय चुकला असल्याचेही बोलत आहेत. ओंकार हा पैशांसाठी तिथे गेला अशी सडकून टीकाही प्रेक्षकांनी केली. पण आता त्याच्याप्रती असलेलं प्रेमही चाहते दर्शवत आहेत. सोशल मिडियावर त्याच्या नावाचा रेटा चाहत्यांनी लावला आहे.

हेही वाचा: Sharmila Tagore Birthday: अभिनय सोडा किंवा शाळा.. देखण्या शर्मिलाला शिक्षकांनी घातली होती अट

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमाचे दिग्दर्शक सचिन गोस्वामी यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत हास्यजत्रेची संपूर्ण टीम क्रिकेट खेळताना दिसत आहे. या व्हिडीओला त्यांनी विरंगुळा असे कॅप्शन दिले आहे. पण या टीम मध्ये ओंकारची कमतरता प्रेक्षकांना जाणवत असल्याने त्यांनी सोशल मिडियावर कमेंट करत त्याला परत आणा.. अशी मागणी केली आहे.

fans want see onkar bhojane again in maharashtrachi hasyajatra show on sony marathi

fans want see onkar bhojane again in maharashtrachi hasyajatra show on sony marathi

‘ओंकार भोजनेला परत बोलवा’ अशी एका चाहत्याने कमेंट केली आहे.तर ‘गोस्वामी सर; मामा-मामी, अग्गं अग्गं आई, सोटू पक्कड दे बरं, इ. स्कीटं कधी बघायला मिळतील? ओंकार भोजनेला बोलवा’, असेही एकाने म्हंटले आहे. तर ‘ओंकार भोजनेला बोलवा, बरेच स्क्रिप्ट त्याच्याशिवाय अधुरे वाटतात’ असेही चाहत्यांचे म्हणणे आहे.