स्मिता पाटील-राज बब्बरचा मुलगा प्रतिकचा घटस्फोट आणि नवं प्रेमप्रकरण चर्चेत Prateik Babbar | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

After Split with ex-wife, prateik babbar has moved on and dating this actress...

स्मिता पाटील-राज बब्बरचा मुलगा प्रतिकचा घटस्फोट आणि नवं प्रेमप्रकरण चर्चेत

Prateik Babbar: अभिनेता राज बब्बर आणि स्मिता पाटील यांचा मुलगा प्रतिक बब्बरनं २३ जानेवारी २०१९ रोजी सान्या सागरसोबत लग्न केले होते. लग्नगाठ बांधण्यापूर्वी दोघांनी एकमेकांना डेट केलं होतं. पण त्यांच्यात लग्नाच्या एक वर्षानंतरच वाद होऊ लागल्याचं समोर आलं. अर्थात लॉकडाऊनच्या दरम्यान अनेकांना आपल्या पार्टनरसोबत वेळ घालवायचा खरंतर क्वालीटी टाईम मिळाला होता. पण प्रतीक आणि सान्या दरम्यान मात्र गोष्टी बिघडत गेल्या. आता हाती आलेल्या ताज्या वृत्तानुसार कळत आहे की,प्रतीक बब्बर पुन्हा प्रेमात पडला आहे.(After Split with ex-wife,prateik babbar has moved on and dating this actress...)

आपल्या पहिल्या लग्नाच्या बंधनातून विभक्त झाल्यावर बातमी आहे प्रतिक बब्बर आयुष्यात पुढे निघून गेला आहे. प्रतिक सध्या आयुष्यात खुश आहे. तसंच तो 'बार बार देखो' अभिनेत्री प्रिया बॅनर्जीला डेट करत आहे. प्रतिक बब्बर आणि प्रिया यांच्यात जवळीकता वाढत असल्याच्या बातम्या आहेत.

प्रतीक बब्बरच्या जवळच्या सूत्रानं सांगितलं की,''प्रिया आणि प्रतीक एकमेकांना जवळपास एक वर्षापासून ओळखतात. छोट्या पडद्यावरील एका कॉमन मित्राच्या मदतीनं ते एकमेकांना भेटले''. सूत्रानं पुढे म्हटले आहे की, ''प्रतीकनं प्रिया बॅनर्जीविषयी आपल्या कुटुंबाला कल्पना दिली आहे. ते दोघे नेहमी बाहेर एकत्र फिरायला जातात. एकत्र काम करतात पण तरीही अद्याप त्यांना आपलं हे नातं सगळ्यांसमोर जाहीर करायचं नाही. ते जेवढं लाइमलाइटपासून दूर राहिल तेवढं चांगलं असं त्याचं सध्या म्हणणं आहे. आणि याचं कारण त्याचं त्याच्या पहिल्या पत्नीपासून विभक्त होणं हे आहे''.

प्रतीकनं मात्र अद्याप यावर काहीच प्रतिक्रिया दिलेली नाही. प्रिया बॅनर्जीविषयी बोलायचं झालं तर,तिने संजय गुप्ता यांच्या 'जज्बा' सिनेमातून इंडस्ट्रीत पदार्पण केलं होतं. प्रतीक बब्बर लवकरच 'वो लडकी है' कहां सिनेमातून दिसणार आहे. या सिनेमात तापसी पन्नू,प्रतीक गांधी मुख्य भूमिकेत आहेत.