'जर तुम्ही भारताचे युवा असाल तर...'; कार्तिकसाठी अग्निहोत्रींचे विधान चर्चेत Vivek Agnihotri | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Vivek Agnihotri post for kartik Aaryan, share a selfie with kartik

'जर तुम्ही भारताचे युवा असाल तर...'; कार्तिकसाठी अग्निहोत्रींचे विधान चर्चेत

Vivek Agnihotri: द काश्मिर फाईल्स चे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री(Vivke Agnihotri) यांनी सोशल मीडियावर कार्तिक आर्यनसोबत(Kartik Aaryan) एक नवा फोटो शेअर केला आहे. दोघांना एकत्र फोटोत पाहून त्यांचे चाहते मात्र भलतेच खूशीत आहेत. त्या फोटोवर कमेंट्सचा वर्षाव होताना दिसत आहे. लोक म्हणताना दिसत आहेत,आता एवढे एकत्र आलात तर एक सिनेमा पण आता करुन टाका मिळून.(Vivek Agnihotri post for kartik Aaryan, share a selfie with kartik)

हेही वाचा: 'या' हॉलीवूड अभिनेत्याला नेटकऱ्यांनी संतापत दिला नसबंदीचा सल्ला, कारण ऐकाल तर..

विवेक अग्निहोत्री यांनी शेअर केलेल्या फोटोत कार्तिकचा व्हाइट टीशर्टवर शर्ट परिधान केलेला कूल लूक दिसत आहे. पहिल्या फोटोत विवेक आणि कार्तिक सेल्फीसाठी स्माईल करताना दिसत आहेत तर दुसऱ्या फोटोत दोघं एकत्र मिळून व्हिक्ट्री साइन देत पोझ देताना दिसत आहेत.

हेही वाचा: IVF ट्रीटमेंटविषयी अभिनेत्री स्पष्टच बोलली, म्हणाली,'बाळ हवंय पण म्हणून...'

इन्स्टाग्रामवर हे फोटो शेअर करत विवेक अग्निहोत्री यांनी त्याला कॅप्शन दिलं आहे की,''कार्तिक आणि त्यांच्यात एक गोष्ट सारखी आहे''. त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं होतं,''ग्वाल्हेरसारख्या स्माॉल टाऊनमधनं आलेले दोघे,मिडल क्लास,आऊटसाइडर ज्यांनी आपल्या हिमतीवर नाव कमावलं''. कार्तिकची प्रशंसा करताना विवेक अग्निहोत्रींनी लिहिलं आहे की,''जर तुम्ही भारताची युवा पिढी असाल तर,डाऊन टू अर्थ, आपल्या संस्कृतीच्या मुळाशी जोडलेला आणि अतिशय हुशार अशा कार्तिक आर्यनकडून प्रेरणा घ्या''. दोघांचा हा एकत्रित फोटो पाहून त्यांचे चाहते मात्र भलतेच खूश आहेत.

हेही वाचा: KBC: जिंकण्याच्या खुशीत स्पर्धक झाला शर्टलेस, पुढे काही घडणार इतक्यात अमिताभनी..

कमेंट्समध्ये लोकांनी लिहिलं आहे की,त्यांना आता कार्तिक आर्यन आणि विवेक अग्निहोत्री यांनी एकत्रित मिळून केलेला सिनेमा पहायचे वेध लागलेत. एका चाहत्यानं विवेक यांच्या पोस्टवर लिहिलं आहे की,'पुढच्या सिनेमात कार्तिकला कास्ट करा'. तर आणखी एकानं लिहिलं आहे,'दोघांना पुढील सिनेमात एकत्र काम करण्याची गरज आहे'. तर दुसऱ्या एकानं लिहिलं आहे, '२०२२ मधील सर्वात यशस्वी दिग्दर्शक आणि सगळ्यात यशस्वी अभिनेता'. एकाच फ्रेममध्ये ब्लॉकबस्टर्स सुपरस्टार्स पाहून एका नेटकऱ्यानं चक्क म्हटलं की,'काय दिल्ली फाईल्स साठी दोघं एकत्र काम करताय?'

'द काश्मिर फाईल्स'ला मिळालेल्या भरघोस प्रतिसादानंतर विवेक अग्निहोत्री आता 'द दिल्ली फाईल्स' बनवणार आहेत. अनुपम खेर यांच्या सोबत विवेक अग्निहोत्री यांनी बनवलेला 'द काश्मिर फाईल्स' १ मार्चला प्रदर्शित झाला होता. ३३० करोड कमावून हा सिनेमा वर्षभरातील अधिक कमाई करणारा सिनेमा बनला आहे.

तर कार्तिक आर्यनच्या 'भूलभूलैय्या २' ने २०० करोडची कमाई करत सुपरहिट सिनेमाचा किताब पटकावला होता. आता कार्तिकचा क्रिती सननसोबतचा 'शहजादा' १० फेब्रुवारी २०२३ रोजी रिलीज होणार आहे.

Web Title: Vivek Agnihotri Post For Kartik Aaryan Share A Selfie With

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..