
Vaalvi Movie: 'वेड' नंतर 'वाळवी'चे गौरवशाली ५० दिवस पूर्ण, प्रेक्षकांसाठी थिएटरमध्ये खास ऑफर
Vaalvi Movie News: रितेश देशमुखचा वेड (Ved) सिनेमा बॉक्स ऑफिसवर प्रचंड गाजला. वेडने काहीच दिवसांपूर्वी गौरवशाली ५० दिवस पूर्ण केले. आता वेड नंतर परेश मोकाशी दिग्दर्शित 'वाळवी' ने सुद्धा थिएटरमध्ये ५० दिवस पूर्ण केले आहेत.
वाळवी पाहण्यासाठी थिएटर मध्ये प्रेक्षकांनी गर्दी केली. हा सिनेमा आजही महाराष्ट्रातल्या अनेक थियटरमध्ये प्रेक्षकांच्या प्रतिसादात सुरु आहे. आता वाळवीला ५० दिवस पूर्ण झाल्याने प्रेक्षकांसाठी खास ऑफर आहे.
('Vaalvi' completes glorious 50 days, special offer in theaters for audience)
नुकतंच झी स्टुडिओजने वाळवी च्या ५० दिवसांची पोस्ट शेयर केलीय. प्रेक्षकांच्या हाऊसफुल्ल प्रेमामुळे #Thrillcom ‘वाळवी’चे ५० दिवस पूर्ण झाले आहेत. त्यानिमित्ताने वाळवी प्रेक्षकांना ९९ रुपयात पाहायला मिळणार आहे.
प्रेक्षकांसाठी खास आठवडाभर हि विशेष ऑफर असणार आहे. त्यामुळे ज्या प्रेक्षकांना वाळवी थिएटरमध्ये पाहायचा असेल त्यांच्यासाठी हि खास पर्वणी असणार आहे.
झी स्टुडिओजची निर्मिती असलेला वाळवी सिनेमा १३ जानेवारी २०२३ ला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला. माऊथ पब्लिसिटीच्या जोरावर वाळवी अल्पावधीत लोकप्रिय झाला. थ्रिलकॉम धाटणीचा हा सिनेमा पाहायला प्रेक्षकानीं पुन्हा पुन्हा गर्दी केली.
काहीच दिवसांपूर्वी वाळवी अमेरिकेत रिलीज होऊन तिकडेही लोकप्रिय झाला. अमेरिकेत सुद्धा वाळवीने हाऊसफुल्ल ची पार्टी झळकवली.
वाळवी १३ जानेवारीला रिलीज झाला आणि त्यानंतर लगेचच शाहरुख खानचा पठाण २५ जानेवारीला रिलीज झाला होता.
पठाण मुळे वाळवीचे थिएटरमधले शो कमी झाले. तरीही मराठी प्रेक्षकांनी वाळवीला प्रेम दिलं. आणि वाळवी सुपरहिट करून दाखवला.
वाळवीच्या सक्सेस पार्टीत झी स्टुडिओजचे हेड मंगेश कुलकर्णी यांनी वाळवी च्या पुढच्या भागाची म्हणजेच वाळवी २ ची घोषणा केली.
झी स्टुडिओज आणि मधुगंधा कुलकर्णी यांनी 'वाळवी'ची निर्मिती केली असून या चित्रपटाची कथा, पटकथा आणि सवांद परेश मोकाशी आणि मधुगंधा कुलकर्णी यांचे आहेत.
स्वप्नील जोशी, सुबोध भावे, अनिता दाते, शिवानी सुर्वे आणि नम्रता संभेराव यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिकेत आहेत. वाळवी काहीच दिवसांपूर्वी ZEE ५ या OTT प्लॅटफॉर्मवर रिलीज झालाय.