Oscar 2023: रॉक सोबत झळकणार Deepika Padukon.. सांभाळणार हि खास जबाबदारी

Oscar 2023 लवकरच संपन्न होणार आहे.
Deepika Padukon, Oscar 2023
Deepika Padukon, Oscar 2023SAKAL

Oscar 2023: Oscar 2023 लवकरच संपन्न होणार आहे. या सोहळ्यात अनेक जगातील लोकप्रिय कलाकार सहभागी असतात. फक्त अभिनेते नाही तर संगीतकार, गीतकार असे अनेक दिग्गज कलाकार Oscar 2023 सोहळयात सहभागी असतात. याच सोहळ्यात भारतीयांसाठी अभिमान वाटणारी घटना घडली आहे. अभिनेत्रो दीपिका पदुकोण Oscar 2023 सोहळ्यात सहभागी होणार आहे.

(deepika padukon joins Dwayne Johnson, Michael B Jordan as a presenter of oscar 2023)

Deepika Padukon, Oscar 2023
Madhura Joshi: गोरी गोरी पान.. फुलासारखी छान

Oscar 2023 सोहळ्यात ज्यांच्या हस्ते पुरस्कार दिला जातो अशा Presenters ची जबाबदारी दीपिका पदुकोण सांभाळणार आहे. इतकंच नव्हे तर दिग्गज कलाकारांच्या यादीत दीपिका पदुकोणचं नवा समाविष्ट झाल्याने भारतीयांसाठी नक्कीच हि अभिमानाची गोष्ट आहे. Oscar 2023 मध्ये Presenters च्या यादीत Dwayne Johnson, Michael B Jordan असे दिग्गज कलाकार सहभागी आहेत.

Deepika Padukon, Oscar 2023
वाण नाय पण गुण लागला, मराठीलाही रिमेकची लागण, हृता - वैभवचा Circuit या साऊथ सिनेमाचा रिमेक?

पोस्ट शेअर करताना दीपिकाने लिहिले, "#oscars#oscars95." पोस्टवर प्रतिक्रिया देताना, दीपिकाचा पती-अभिनेता रणवीर सिंगने टाळ्या वाजवणाऱ्या ईमोजी शेयर करून लव्ह रिऍक्शन दिली आहे. अभिनेत्री नेहा धुपिया कमेंट करून लिहिते, "दिपू ऑस्कर मध्ये तुला पाहण्यासाठी खूप आतुर आहे" अशा प्रतिक्रिया देत बॉलिवूड कलाकारांनी दीपिका पदुकोणचं अभिनंदन केलंय.

Oscar 2023 सोहळ्यात Dwayne Johnson, Michael B Jordan, Riz Ahmed, Emily Blunt, Glenn Close, Troy Kotsur, Jennifer Connelly, Samuel L Jackson, Melissa McCarthy, Zoe Saldana, Donnie Yen, Jonathan Majors, Janelle Monae, Ariana DeBose असे दिग्गज कलाकार Presenters म्हणून सहभागी आहेत. अशा दिग्गज कलाकारांच्या यादीत दीपिका पदुकोणला मिळणारं स्थान अभिमानचं आहे.

Deepika Padukon, Oscar 2023
Prajakta Mali: आईशपथ तुझ्यावर प्रेम करतो मी प्राजु...

दरम्यान दीपिका पदुकोणचा शाहरुख खान सोबतचा पठाण सिनेमा प्रचंड गाजला. पठाणने न भूतो न भविष्यती असा गल्ला बॉक्स ऑफिसवर जमवला. पठाणने आजवर १००० कोटीपेक्षा जास्त गल्ला जमवला आहे. पठाण नंतर दीपिका हृतिक रोशन सोबत फायटर या सिनेमात झळकणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com