अहमदनगरचा जयेश खरे एका गाण्याने व्हायरल झाला अन् थेट अजय-अतुल पर्यंत पोहोचला.... Ajay Atul | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ahmednagar jayesh Khare viral video, sing a song with ajay-atul in Maharashtra Shahir, Ankush Chaudhari Post

अहमदनगरचा जयेश खरे एका गाण्याने व्हायरल झाला अन् थेट अजय-अतुल पर्यंत पोहोचला....

Jayesh Khare Viral Video: महाराष्ट्राच्या लोककलेला समृद्ध बनवणारे ख्यातनाम मराठी शाहीर- शाहीर साबळे यांच्यावर दिग्दर्शक केदार शिंदे सिनेमा काढतायत. सध्या सिनेमाची तयारी जोरदार सुरु आहे. सर्वांचेच लाडके दिग्ग्ज संगीतकार अजय-अतुल याचं संगीत करतायत. आता शाहीर साबळेंवर सिनेमा म्हटला की संगीताचा दर्जा हा चांगलाच हवा. कुठेही कसर राहून चालणार नाही हे ओघाने आलं. पण आता या सिनेमाच्या संगीतासंदर्भात सिनेमातील मुख्य कलाकार अंकुश चौधरीनं केलेली पोस्ट चर्चेत आली आहे. का तर याचा संबंध थेट लागतोय ते काही दिवसांपू्र्वी एका व्हायरल व्हिडीओनं चर्चेत आलेल्या अहमदनगरच्या जयेश खरेशी. 'चंद्रा' फेम जयेश खरे लोकांच्याच नाही तर दस्तुरखुद्द अजय-अतुलच्या मनालाही भिडला आणि त्याला ते थेट घेऊन आले रेकॉर्डिंग स्टुडिओत. आता तो गाणार आहे 'महाराष्ट्र शाहीर' या सिनेमातील गाणं.(Ahmednagar jayesh Khare viral video, sing a song with ajay-atul in Maharashtra Shahir, Ankush Chaudhari Post)

हेही वाचा: KBC 14: अख्खा एपिसोड रडत-रडतच खेळली 'ही' स्पर्धक, अखेर अमिताभसमोर दिली भावूक कबूली

अंकुश चौधरीनं या संदर्भात माहिती देत आपल्या पोस्टमध्ये यासंदर्भात लिहिताना म्हटलं आहे, अस्सल मातीतला कलाकार viral video ने सापडतो. आणि थेट अजय अतुल यांच्यापर्यंत पोहोचतो... महाराष्ट्र शाहीर या सिनेमासाठी त्याचं गाणं रेकॉर्ड होतं... इतिहास असाच लिहिला जातो. महाराष्ट्र शाहीर... २३ एप्रिल २०२३...

हेही वाचा: 'काल मला माझी दुर्गा भेटली...',नवरात्रीच्या मुहूर्तावर हेमांगीच्या पोस्टचीच चर्चा

केदार शिंदे दिग्दर्शित या सिनेमात अंकुश चौधरी शाहीर साबळे यांची मुख्य भूमिका साकारत आहे. त्यानं स्वतःही ही भूमिका साकारण्यााठी बरीच मेहनत घेतली आहे. आता महाराष्ट्र शाहीर सिनेमा रिलीज आधीच चर्चेत आला, तो जयेश खरे या व्हायरल व्हिडीओमुळे चर्चेत आलेल्या अहमदनगरमधील शाळकरी मुलाचं नाव सिनेमाशी जोडल्यानं. जयेश खरे या अहमदनगरमधील शाळकरी मुलाच्या व्हिडीओनं अख्खा महाराष्ट्र भरुन पावला होता, याचं कारण म्हणजे अंगावर काटा आणणारा जयेशचा आवाज.

त्या व्हायरल व्हिडीओत जयेश वर्गात गाणं गाताना दिसला. त्यानं लावणी गायली आणि त्याची भूरळ अख्ख्या महाराष्ट्राला पडलेली आपण पाहिली असेल. त्याचं गाणं बरंच ट्रेन्डिंगला होतं. गावात कोणत्याही भौतिक सुविधा नसताना असा हिरा सापडणं आणि तो पारखणं खरंतर खूप अवघड. परंतु जयेशच्या शिक्षकांनी त्याच्यातलं टॅलेंट ओळखलं आणि त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला. जो लोकांना इतका आवडला होता की त्याच्यावर कौतुकास्पद प्रतिक्रियांचा वर्षाव झाला.

हेही वाचा: हॉट...'चहा' की 'तितिक्षा'...

त्याच जयेशला सोबत घेऊन आता अजय-अतुल 'महाराष्ट्र शाहीर' सिनेमातील गाणं रेकॉर्ड करत आहेत. अंकुशनं आपल्या इन्स्टावर जयेशचा रेकॉर्डिंग स्टुडिओतला तो व्हिडीओ शेअर केला आहे. एवढ्या लहान वयात मौलिक संधी मिळणं खूप कमी जणांच्या भाग्यात असतं. पण जयेशनं आपल्या टॅलेंटनं ते घडवून आणलं. अर्थात म्हणतात नं इतिहास असेच घडतात ते काही खोटे नाही.