'काल मला माझी दुर्गा भेटली...',नवरात्रीच्या मुहूर्तावर हेमांगीच्या पोस्टचीच चर्चा Hemangi Kavi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Heman gi Kavi Post

'काल मला माझी दुर्गा भेटली...',नवरात्रीच्या मुहूर्तावर हेमांगीच्या पोस्टचीच चर्चा

Hemangi Kavi: हेमांगी कवी तिच्या नाटक-सिनेमातील भूमिकेमुळे जेवढी चर्चेत राहिली नसेल तितकी अनेकदा तिच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे राहिली आहे. ती स्पष्टवक्ती आहे, मनात ते ओठांवर बोलणारी आहे किंवा त्याहून अधिक चपखल शब्द तिच्या व्यक्तिमत्त्वाला शोभतो तो 'ती बंडखोर' आहे. अर्थात यामुळे अनेकदा तिच्या पोस्टवरनं वाद रंगतात किंवा ती ट्रोल होतानाही दिसते. पण यामुळे मागे हटणाऱ्यांपैकी हेमांगी कवी नाही हे आतापर्यंत आपल्या सगळ्यांच्याच लक्षात आले असेल.

नुकतीच हेमांगीनं एक पोस्ट केलीय,ज्याची चर्चा होतेय. कारण नवरात्रीच्या उत्सवाला सुरुवात झाली अन् हेमांगीनं लिहिलं,'हीच माझी दुर्गा...', बरं सोबत एका अभिनेत्रीचा फोटो पोस्ट केलाय,ज्यात तिचा चेहरा तिनं दाखवला नाहीय. पण हेमांगीनं त्या अभिनेत्रीबद्दल जे काही लिहिलंय ते वाचलं की सारं स्पष्ट होत जातं अन् फोटोत नेमकं कोण आहे याविषयी जाणून घेण्याची उत्सुकता मात्र चाळवते.(Navratrotsav 2022: Hemangi Kavi Post, Ravi Jadhav webseries)

हेही वाचा: भार्गवीचं मन अडकलंय लुगड्यात...

हेमांगीनं केलेली पोस्ट ही रवी जाधव दिग्दर्शित नव्या वेबसिरीज संदर्भात आहे. म्हणजे त्याचं झालं असं की रवी जाधव जी वेबसिरीज करतायत त्यात हेमांगी काम करतेय आणि त्यात तिच्यासोबत जी अभिनेत्री आहे तिच्याशी काम करण्याचं आपलं स्वप्न रवी जाधवनं पूर्ण केलं यासाठी हेमांगी पोस्टमध्ये त्याचे धन्यवादही मानताना दिसते. चला जाणून घेऊया नेमकं काय लिहिलं आहे हेमांगीनं पोस्टमध्ये..

हेमांगीनं पोस्टमध्ये लिहिलं आहे,काल मला माझी दुर्गा भेटली.

दगड मातीच्या मूर्तींपेक्षा मी माणसांमध्ये देव शोधते आणि मला भेटतात ही.

मी आणि @ravijadhavofficial सर एकाच कॉलेज चे, जे जे चे.

रवी सर माझे Senior!2008 ला माझ्या पहिल्या चित्रपटाच्या वेळी धुडगूससाठी रवी सरांनी campaining केलं होतं ते थेट आता एकत्र काम करायचा योग जुळून आला आणि काय कमाल योग जुळून आलाय. रवी सरांच्या आगामी webseries मध्ये मी जिच्या सोबत काम करतेय ती माझ्यासाठी दुर्गाच आहे. एका अर्थी आज मी जिथे आहे ते तिच्या मुळेच! योग्य वेळ आल्यावर सांगेनच कसं ते! पण ज्याची कल्पना ही केलेली नसते साधं स्वप्न ही पाहिलेलं नसतं जेव्हा ते आपल्या समोर उभं राहतं तेव्हा आपलं काय होत असेल ओ?

हेही वाचा: हॉट...'चहा' की 'तितिक्षा'...

ती साक्षात माझ्या समोर उभी होती! कसं? तिला डोळ्यात सामावून घेऊ की खूप बोलू की गप्प बसून नुसतं न्याहाळत राहू? Scene करताना ती माझ्या डोळ्यात बघत होती, हातात हात घेत होती, मला जवळ घेत होती. Scene संपल्यावर मला मिठी मारत होती! आई शप्पथ! प्रश्न पडत होते, Is this real? सांगणार सगळं सांगणार तोपर्यंत…Ravi Sir i owe this to you. Big time.Industry तले लोक तुम्हांला प्रेमानं, लाडा नं 'देवा' म्हणतात ना...मी म्हणेन, 'देवा मी न मागता माझ्या पदरात हे दान टाकलस की रे! काल दिवसाची सुरवात देवीच्या दर्शनाने झाली तर सांगता इंद्रधनू ने!

यालाच देव पावल्याचे संकेत म्हणायचे| घटस्थापना आणि शारदीय नवरात्रीच्या तुम्हांला सर्वांना शुभेच्छा!

हेही वाचा: 'माझ्या हातात असतं तर मी हिला...', नेहा कक्करवर भडकली फाल्गुनी पाठक, वाचा प्रकरण...

एक मात्र नक्की म्हणता येईल की हेमांगीच्या पोस्टनं चाहत्यांची उत्सुकता चाळवली आहे, लोक हेमांगीसोबत त्या फोटोत नेमकी कोणती अभिनेत्री आहे यावरनं अंदाज लावताना दिसत आहेत. अनेकांनी उषा नाडकर्णी यांचे नाव घेतले आहे. आता पाहूया हेमांगी आपल्या दु्र्गेचं नाव कधी समोर आणतेय ते. आता हे सर्वस्वी रवी जाधव यांच्याच हातात असणार म्हणा..तेव्हा वाट पाहूया.