Aindrilla Sharma: दोनदा कॅन्सरवर मात, आता ब्रेन स्ट्रोकमुळे अभिनेत्रीची पुन्हा मृत्युशी झुंज सुरू TV Actress,OTT Actress | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Aindrilla Sharma is critical after suffered stroke on ventilator

Aindrilla Sharma: दोनदा कॅन्सरवर मात, आता ब्रेन स्ट्रोकमुळे अभिनेत्रीची पुन्हा मृत्युशी झुंज सुरू

Aindrilla Sharma :प्रसिद्ध अभिनेत्री एंड्रिला शर्मा सध्या मृत्यूशी झुंज देत असल्याची मोठी बातमी समोर येत आहे. एंड्रिला शर्माची तब्येत अचानक बिघडल्याने तिला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं गेलं होतं आणि आता तिची तब्येत गंभीर असल्याचं समोर आलं आहे.(Aindrilla Sharma is critical after suffered stroke on ventilator)

हेही वाचा: The Kerala Story Teaser: 'केरळमधून कशा बेपत्ता झाल्या ३२,००० महिला? घटनेमागचं सत्य आता पडद्यावर...

एंड्रिलाविषयी हे कळल्यावर कदाचित आपण हैराण व्हाल की तिनं याआधी दोनदा कॅन्सरसारख्या आजारावर मात केली आहे. पण आता अचानक तिची तब्येत बिघडल्याचं कळत आहे. हॉस्पिटलच्या सूत्रांनी सांगितल्यानुसार एंड्रिलाला ब्रेन स्ट्रोक आला आहे, तिच्या डोक्यात रक्ताच्या गाठी झाल्या आहेत. अभिनेत्री सध्या व्हेंटिलेटरवर आहे,आणि तिची परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. सध्या तिच्यावर हावडा येथील खाजगी रुग्णालयात उपचार केले जात आहेत.

हेही वाचा: India Lockdown: सिनेमाच्या पोस्टरवरील सईच्या लूकवरनं भडकलं पब्लिक; म्हणाले, 'नेहमीच मराठी कलाकार..'

शॉकिंग गोष्ट ही आहे की अभिनेत्रीचं वय पंचवीशीच्या आत आहे. एंड्रिला शर्माची तब्येत बिघडल्याची बातमी गेल्या दोन दिवसांत समोर आली आहे. यामुळे आता तिचे चाहते मात्र चिंतेत आहेत आणि आपली लाडकी अभिनेत्री बरं होण्यासाठी प्रार्थना करताना दिसत आहेत.

एंड्रिला शर्मानं दुसऱ्यांदा कॅन्सरवर मात केल्यानंतर पुन्हा अभिनयक्षेत्रात कमबॅक केलं होतं. याआधी तिला एका क्रिटिकल सर्जरीमधून जावं लागलं होतं. तिनं त्यासाठी केमोथेरपी सेशनही घेतले आहेत. केमोथेरपीनंतर डॉक्टर्सनी तिला कॅन्सरमधून ती मुक्त झाल्याचं जाहीर केलं होतं. पण त्यानंतर अचानक अभिनेत्रीची तब्येत बिघडली. तिच्या कुटुंबासाठी हा मोठा धक्का आहे.

हेही वाचा: Sai Tamhankar: असं काय घातलंय सईने की तेजस्विनी पंडीत म्हणाली,अबब!

एंड्रिला शर्मानं काही दिवसांपूर्वी काही ओटीटी प्रोजेक्ट्समधून काम केलं आहे. एंड्रिला शर्माने अभिनय क्षेत्रात पदार्पण 'झुमर' या मालिकेतून केलं होतं. त्यानंतर तिनं अनेक प्रसिद्ध मालिकांमधून काम केलं आहे. एंड्रिला शर्माने Jibon Jyoti,Jiyon Kathi मध्ये मुख्य भूमिका साकारली आहे.