अभिषेकचं ट्विट; ऐश्वर्या राय पुन्हा होणार आई...

वृत्तसंस्था
गुरुवार, 23 जानेवारी 2020

अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. ऐश्वर्या राय पुन्हा आई होणार का? असे ट्विट नेटिझन्स करू लागले आहेत. ट्विट करण्यामागे कारणही तसे आहे.

मुंबई : अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. ऐश्वर्या राय पुन्हा आई होणार का? असे ट्विट नेटिझन्स करू लागले आहेत. ट्विट करण्यामागे कारणही तसे आहे. 'मित्रांनो, तुमच्या सर्वांसाठी एक सरप्राईझ आहे.' असे ट्विट अभिनेता आणि ऐश्वर्या राय बच्चनचा पती अभिषेक बच्चनने केले होते.

ऐश्वर्या म्हणाली, सलमान सर्वात सेक्सी पुरुष

अभिषेकने ट्विट केल्यानंतर नेटिझन्स रिट्विट करू लागले. रिट्विट करताना ऐश्वर्या पुन्हा आई होणार का?, आराध्यासोबत खेळायला भाऊ किंवा बहीण का? असे अंदाज नेटिझन्स करू लागले. अखेर अभिषेकने पुन्हा ट्विट करत 'झुंड' चित्रपटाचा टीझर शेअर करत यासर्व चर्चांना पूर्णविराम दिला. 'झुंड' चित्रपटात अभिनेते अमिताभ बच्चन यांची मुख्य भूमिका आहे. नागराज मंजुळेच्या दिग्दर्शनात साकारलेला 'झुंड' हा विजय बारसे यांच्या जीवनावर प्रकाशझोत टाकण्यात येणार असल्याचे म्हटले जात आहे. अभिषेक देखील त्याच्या आगामी चित्रपटांमध्ये व्यस्त आहे. 'बॉब बिस्बास' आणि 'बिग बुल' या दोन चित्रपटांच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे.

दरम्यान, अभिषेकच्या ट्विटने काही वेळ अनेकांनी वेगवेगळे अंदाज बांधले. अखेर अभिषेकनेच चर्चांना पुर्णविराम दिला.

ऐश्वर्या राय म्हणते, माझे पती घालतात महिलांची कपडे....


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: aishwarya rai will be the mother again abhishek tweet