अजय देवगणने चित्रपटात घेतले प्रथमच चुंबन!

वृत्तसंस्था
गुरुवार, 22 सप्टेंबर 2016

हॉलिवूडप्रमाणे बॉलिवूडमधील चित्रपटांमध्येही चुंबनाचे दृष्य सर्रास दिसू लागले आहेत. अभिनेता अजय देवगण चुंबनाच्या दृष्यावरून सध्या सर्वाधिक चर्चेत आला आहे. यामागचे कारण म्हणजे त्याने चित्रपटसृष्टीतील 25 वर्षांच्या कारकिर्दीत प्रथमच चुंबनाचे दृष्य दिले आहे.

हॉलिवूडप्रमाणे बॉलिवूडमधील चित्रपटांमध्येही चुंबनाचे दृष्य सर्रास दिसू लागले आहेत. अभिनेता अजय देवगण चुंबनाच्या दृष्यावरून सध्या सर्वाधिक चर्चेत आला आहे. यामागचे कारण म्हणजे त्याने चित्रपटसृष्टीतील 25 वर्षांच्या कारकिर्दीत प्रथमच चुंबनाचे दृष्य दिले आहे.

चित्रपटसृष्टी अन् चुंबन हे समीकरण काही नव्याने राहिलेले नाही. ‘ए दिल है मुश्किल‘ या चित्रपटामध्ये रणबीर कपूर व ऐश्वर्या राय-बच्चनने चुंबनाचे दृष्य दिले होते. परंतु, ‘शिवाय‘ या चित्रपटामध्ये अजय देवगण सहअभिनेत्रीसोबत तीन मिनिट चुंबन घेताना दिसणार आहे. चित्रपटाचा ट्रेलर सध्या सोशल नेटवर्किंग साइटवरून व्हायरल होताना दिसत आहे. सूत्रांनी सांगितले की, ‘अजय देवगणने कधीही चुंबनाचे दृष्य देणार नसल्याचे म्हटले नव्हते. ‘शिवाय‘ चित्रपटात चुंबनाच्या दृश्याची गरजच होती. त्यामुळे तीन मिनिटांचे हे दृष्य पडद्यावर दाखविण्यात येणार आहे.‘

बॉलिवूड चित्रपटांमध्ये चुंबनाचे दृष्य दाखविलेले काही प्रमुख चित्रपट पुढीलप्रमाणे-

  • सन 1933 मध्ये प्रदर्शित झालेल्या कर्मा या चित्रपटात अभिनेत्री देविका राणी व अभिनेता हिमांशू राय यांनी चार मिनिटांचे चुंबनाचे दृष्य दिले होते. (खऱयाखुरय़ा आयुष्यात ते पती-पत्नी होते)
  • चित्रपट ‘व्योमकेश बख्शी‘मध्ये सुशांतसिंह राजपूत व स्वास्तिका मुखर्जीनेही चुंबनाचे दृष्य दिले होते.
  • ‘टशन‘ या चित्रपटात करिना कपूर व सैफ अली खानने चुंबनाचे दृष्य दिले होते.
  • ‘राज 3‘ या चित्रपटामध्ये बिपाशा बसू व इम्रान हाश्मीनेही चुंबनाचे दृष्य दिले होते.
  • ‘राजा हिंदूस्तानी‘ चित्रपटात आमिर खान व करिश्मा कपूर चुंबनाचे दृष्य दिले होते. त्यावेळी ते दृष्य चांगलेच चर्चेत आले होते.
  • ‘जांबाज‘ चित्रपटात डिंपल कपाडिया व अनिल कपून यांनीही दृष्य दिले होते.
  • ‘बैंड बाजा बारात‘मध्ये रणवीरसिंह व अनुष्का शर्मा यांच्यातील एक मिनिट चुंबनाचे दृष्य चित्रपटात दाखविण्यात आले होते.
  • सन 2016 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘फितूर‘ चित्रपटामध्येही कतरीना कैफ व आदित्य रॉय कपूर यांनी चुंबनाचे दृष्य दिले होते.
Web Title: Ajay Devgn is all set to kiss on screen for the first time